Vaibhav Sooryvanshi : वैभवची खरी परीक्षा तर अजून व्हायची आहे, दिग्गज क्रिकेटपटूचे मत

राजस्थान : आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सने ११ पैकी ६ सामने जिंकत १२ गुणांसह गुणतालिकेत सहावे स्थान मिळवले आहे. अद्याप त्यांचे तीन सामने व्हायचे आहेत. राजस्थानकडून २०२५ मध्ये पदार्पण केलेल्या वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत आयपीएलचे १८ सामने खेळून ६९२ धावा केल्या आहेत. यात १०३ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. आयपीएलमध्ये दोन शतके आणि तीन अर्धशतके त्याच्या नावावर आहेत. यंदाच्या हंगामात ११ सामन्यांत ४४० धावा करणाऱ्या वैभवने याच वर्षी १०३ ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी केली आहे. यंदाच्या वर्षी त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके केली आहेत. तुफान फटकेबाजी करणाऱ्या वैभवचे कौतुक करतानाच दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्सने एक वास्तव पण सांगितले.वैभव सूर्यवंशी छान खेळत आहे. आयपीएलमधील त्याची कामगिरी कौतुकास्पद आहे. पण त्याची खरी परीक्षा अजून व्हायची आहे. त्याचा पुढील प्रवास एवढा सोपा नसेल; असे एबी डिविलियर्स म्हणाला.



नेमकं काय म्हणाला एबी डिविलियर्स ?


एबी डिविसलियर्स फॉर द लव्ह ऑफ क्रिकेट या पॉडकास्टवर बोलताना म्हणाला, १५ वर्षे या वयात वैभव अशी कामगिरी करत असल्याचे बघून आश्चर्य वाटत आहे. वैभवने केवळ टी-२० क्रिकेटला प्राधान्य दिले तर तो टी -२० इतिहासात सर्वोत्तम खेळाडू होईल यात शंकाच नाही. पण टी-२० व्यतिरिक्त त्याने एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्येही नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला तर त्याला मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. टी-२० हा क्रिकेटचा अतिशय वेगवान प्रकार आहे. या प्रकारात कमी वेळात सामन्याचा निकाल लागतो. पण एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये कामगिरीवर जोर द्यावा लागतो. संयम आणि सामर्थ्य यांची परीक्षा एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये होते. कसोटी क्रिकेटमध्ये मानसिकदृष्ट्या दीर्घकाळ टिकाव धरावा लागतो. थोडक्यात सांगायचे तर टी-२० च्या तुलनेत एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खूप वेगळे आहे. यामुळे टी-२० सारखेच खेळणे एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये कठीण आहे. शिवाय टी-२० च्या तुलनेत एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये जास्त उत्तम फिटनेसची गरज आहे. अशा वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जात एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळावे लागते. याच कारणांमुळे टी-२० मध्ये चमकदार कामगिरी केली तरी एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये तशीच कामगिरी करणे कठीण आहे. वैभवला सर्व प्रकारचे क्रिकेट खेळायचे असेल तर त्याने या विषयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आणि त्यांच्या देखरेखीत तयारी करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्याने फक्त टी -२० खेळण्यासाठी नियोजन करून इतिहास घडवावा.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून