Anand Paranjpe : राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आनंद परांजपे शिवसेनेच्या वाटेवर ?

ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकेकाळचे विश्वासू आणि पुढे राष्ट्रवादीत जाऊन अजित पवारांच्या मार्गदर्शनात स्थिरावलेले माजी खासदार आनंद परांजपे यांनी तब्बल १४ वर्षांच्या राजकीय प्रवासानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. आनंद परांजपे एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात काम करण्यासाठी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.





माजी खासदार आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याचे पत्र त्यांनी स्वतःच्या अधिकृत सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध केले आहे. आनंद परांजपेंनी राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्या सुनेत्रा पवार यांना राजीनामा पाठवला आहे.


आनंद परांजपे राज्यसभा किंवा विधानपरिषद यापैकी एका सभागृहासाठी इच्छुक होते. पण अजित पवारांनी त्यांना वारंवार वेगवेगळी कारणे देऊन संधी नाकारली. आता अजित पवारांच्या पश्चात संधी मिळेल याची खात्री वाटत नसल्यामुळे आनंद परांजपेंनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.


आनंद परांजपे यांनी २०१४ मध्ये श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता आणि श्रीकांत शिंदे खासदार झाले होते. पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आनंद परांजपे श्रीकांत शिंदेंसाठी मनापासून प्रचार करताना दिसले. त्यानंतर श्रीकांत शिंदे आणि आनंद परांजपे यांच्यातील सलोखा वाढत गेला. आता तर श्रीकांत शिंदेंमुळेच आनंद परांजपे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.


शिवसेना खासदार प्रकाश परांजपे यांच्या निधनानंतर झालेली लोकसभा निवडणूक पुत्र म्हणून आनंद यांनी लढवली होती. या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी आनंद परांजपे यांना शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आणले होते. एकनाथ शिंदे हे आनंद परांजपेंना त्यांचे मानसपुत्र म्हणत होते.


प्रकाश परांजपेंच्या निधनानंतर उर्वरित कार्यकाळासाठी आनंद परांजपे शिवसेनेच्या तिकिटावर खासदार झाले. ते २००८ ते १६ मे २००९ या काळात ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. नंतर १६ मे २००९ ते १६ मे २०१४ या काळात ते शिवसेनेचेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. पण २०१२ मध्ये आनंद परांजपेंनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनी राष्ट्रवादीसाठी ठाणे जिल्ह्यात पक्ष बांधणीचे भरपूर काम केले. आनंद यांच्या बंडामुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ झाले होते. पण मागील १४ वर्षांत राजकारणात बरंच काही घडलं बिघडलं आहे. आता पुन्हा एकदा आनंद परांजपे नवी इनिंग खेळण्याची तयारी करत आहेत. लवकरच ते पुढील वाटचालीबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण