Marathi Actor Cannes Look : कान्सच्या रेड कार्पेटवर मराठमोळा जलवा! पुष्कर जोगचा डॅशिंग लूक चर्चेत

फ्रान्स : सध्या जगभरात ७९ व्या कान्स फिल्म फेस्टिवलची जोरदार चर्चा सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूड आणि हॉलीवुडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी या प्रतिष्ठित सोहळ्यात हजेरी लावली. रेड कार्पेटवरील त्यांच्या स्टायलिश एन्ट्रीज, हटके फॅशन आणि ग्लॅमरस लूकची सर्वत्र चर्चा रंगली आहे. मात्र, या सगळ्या स्टार्समध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्याने खास लक्ष वेधून घेतलं आहे.



मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) याने यंदा कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये उपस्थिती लावत मराठी इंडस्ट्रीचा झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकवला आहे. रेड कार्पेटवर काळ्या रंगाचा स्टायलिश सूट, डोळ्यांवर गॉगल आणि आत्मविश्वासपूर्ण अंदाजात पुष्कर जोग झळकला. त्याचा हा डॅशिंग आणि क्लासी लूक अनेक बॉलिवूड कलाकारांनाही टक्कर देणारा ठरला.





कान्स फिल्म फेस्टिवलमधील त्याचा अनुभव पुष्करने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.



या पोस्टमध्ये पुष्करने लिहिलं, “७९ व्या कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर चालण्याचा अनुभव खरोखरच भारावून टाकणारा होता. आंतरराष्ट्रीय मीडिया, फ्रेंच पापाराझी, हॉलीवुडमधील अभिनेते आणि दिग्दर्शक तुमच्या शेजारून जात असताना तो प्रत्येक क्षण अविस्मरणीय वाटत होता.”


पुढे तो म्हणाला, “या जागतिक व्यासपीठावर माझ्या देशाचं, भारताचं आणि माझ्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणं ही अत्यंत अभिमानाची आणि खास भावना होती. जय महाराष्ट्र!”


या खास क्षणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पुष्करने आपल्या कुटुंबाचाही उल्लेख केला. “मी या क्षणासाठी मनापासून देवाचे आणि माझ्या आई-वडिलांचे आभार मानतो. लव्ह यू फेलिशा… डॅडा फ्रान्स टीव्हीवर कान्स फेस्टिवलमध्ये लाईव्ह दिसला,” असं भावूक होत त्याने पोस्टमध्ये लिहिलं.


पुष्कर जोगच्या या लूकचं आणि त्याच्या यशाचं चाहते भरभरून कौतुक करत आहेत. एखादा मराठी अभिनेता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतो, ही संपूर्ण मराठी मनोरंजनसृष्टीसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

Comments
Add Comment

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

Nepal Floods : नेपाळच्या महापुरात बँक बुडाली, पण आत सापडला कोट्यवधींचा खजिना; ५० कोटींचे सोने, रोकड आणि चांदी सुरक्षित बाहेर

काठमांडू : नेपाळमध्ये भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. पूर आणि

PM Modi SCO Summit : बिश्केकमध्ये पंतप्रधान मोदींची पुतीन, पेझेश्कियन यांच्याशी भेट; वर्ल्ड नोमॅड गेम्सच्या उद्घाटन सोहळ्यालाही उपस्थिती

बिश्केक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या किर्गिस्तानच्या दौऱ्यावर असून, बिश्केक येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन

US Iran Conflict : अमेरिकेच्या हल्ल्याला इराणचा पलटवार; जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला, होर्मुजमध्ये तणाव वाढला

तेहरान : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे. अमेरिकेने इराणच्या लारक बेटावरील दोन रॉकेट

North Cyprus Ferry Accident : मोठी बातमी! २७० प्रवाशांना घेऊन जाणारी फेरी बोट उलटली; १०० हून अधिक जणांची सुटका, बचावकार्य सुरू

उत्तर सायप्रस : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. २७० प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी

Switzerland Rave Shooting : स्वित्झर्लंडमध्ये रेव्ह पार्टीत अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू, पाच गंभीर जखमी

बर्न : स्वित्झर्लंडमधील आराऊ शहरात रविवारी पहाटे रेव्ह पार्टीदरम्यान झालेल्या अंदाधुंद गोळीबारात एका