Oath-Taking Ceremony Vidhanparishad : विधानपरिषदेच्या १० नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी संपन्न

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले नऊ आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेले एक अशा एकूण १० नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात दिमाखात पार पडला. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या सर्व नवनियुक्त आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधीसोबतच वरिष्ठ सभागृहातील राजकीय समीकरणे आता अधिक स्पष्ट झाली आहेत.



या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील वरिष्ठ सदस्य आणि विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. दरम्यान, भाजपने या निवडीतून प्रस्थापित बड्या चेहऱ्यांऐवजी संघटनात्मक बांधणीत सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिल्याचे दिसून आले. सुनील कर्जतकर (मराठवाडा), प्रमोद जठार आणि माधवी नाईक (कोकण), संजय भेंडे (विदर्भ) तर विवेक कोल्हे (उत्तर महाराष्ट्र) यांच्या रूपाने भाजपने विभागीय समतोल साधण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे. कोअर कमिटीने पाठवलेली ३० नावांची यादी दिल्लीहून परतल्यानंतर निवडलेल्या या पाच नावांमध्ये प्रादेशिक आणि जातीय समीकरणांचा अचूक मेळ घालण्यात आला आहे.


शपथ घेतलेले नवनियुक्त आमदार

१) डॉ. नीलम गोऱ्हे - शिवसेना
२) बच्चू कडू - शिवसेना
३) अंबादास दानवे - उबाठा
४) डॉ. प्रज्ञा सातव - भाजप
५) प्रमोद जठार - भाजप
६) झीशान सिद्दीकी - राष्ट्रवादी
७) माधवी नाईक - भाजप
८) सुनील कर्जतकर - भाजप
९) विवेक कोल्हे - भाजप
१०) संजय भेंडे - भाजप


संघनात्मक बळकटीकरणावर भर

सुनील कर्जतकर आणि संजय भेंडे यांच्या निवडीतून भाजपने पक्षाची पाळेमुळे ग्रामीण भागात घट्ट करण्यावर भर दिला आहे. तसेच महिला मोर्चाच्या आक्रमक नेत्या माधवी नाईक, पश्चिम महाराष्ट्रातील विवेक कोल्हे आणि कोकणातील प्रमोद जठार यांच्या माध्यमातून संबंधित विभागांत महायुतीची राजकीय ताकद बळकट करण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे. शपथविधीनंतर सर्व नवनियुक्त सदस्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा