PBKS vs MI : आज मुंबई-पंजाब आमने सामने; पंजाबसाठी करो या मरो ची लढत, सलग चार पराभवांचा दबाव

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज ५८ वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात धर्माशाळाच्या एचपीसीए स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सलग चार पराभावनंतर पंजाब दबावाखाली आहे. दुसरीकडे मुंबई प्लेऑफ रेसमधून बाहेर झाली आहे. यामुळे मुंबई फियरलेस क्रिकेट खेळताना दिसू शकते.


श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्सने हंगामाची सुरुवात चांगली केली होता. मात्र मागील चार सामन्यांपासुन संघाची लय हरपलेली दिसली. सलग चार पराभवामुळे प्लेऑफ रेसमधून बाहेर होण्याचा धोक्का निर्माण झाला आहे. पंजाबने आतापर्यंत ११ पैकी सहा सामने जिंकले आहेत. त्यांचा एक सामना पाऊसामुळे वाया गेला,त्यामुळे १३ गुणांसह पंजाब गुणतालिकेत चवथ्या स्थानावर आहे.प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी पंजाबला उर्वरित तीन पैकी दोन सामने जिंकणयाची गरज आहे. दुसरीकडे आरसीबीच्या विरुद्धात झालेल्या पराभवानंतर मंबईचे प्लेऑफ आव्हान संपुष्टात आले आहे. हा हंगामा मुंबईसाठी त्यांच्या आयपीएल इतिहसातील सर्वात खराब हंगामा गेला आहे. संघाने ११ पैकी तीन सामने जिंकले आहेत. सहा गुणांसह ते नव्या स्थानावर आहेत.


पंजाबसाठी या हंगामात प्रत्येक फलंदाजानी चांगली कामगिरी केली आहे. कूपर कॉनोलीने संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ११ सामन्यात ४१५ धावा केल्या आहेत. यात त्याने एक शतक आणि दोन अर्धशतक ही केले आहेत. या हंगामात पंजाबच्या गोलंदाजीचा इकॉनमी रेट सर्व दहा संघांपैकी सर्वात खराब आहे. अर्शदीप सिंहने संघासाठी ११ सामन्यात १३ विकेट्स घेतले आहेत. मंबई इंडियन्ससाठी रायन रिकेल्टनने सर्वधिक धावा केल्या आहेत त्याने आठ सामन्यात ३८० धावा केल्या आहेत. गोलंदाजीत एएम घझनफरने ९ सामन्यात सर्वाधिक १३ विकेट्स घेतल्या आहेत.



हेड टु हेड


आयपीएलच्या इतिहासात मुंबई आणि पंजाबमध्ये आतापर्यंत ३५ वेळा लढत झाली आहे. यात दोघांनीही १७-१७ सामने जिंकले आहेत, तर एक सामना पाऊसमुळे परिणामहीन झाला होता .आज जिंकणार संघ आघाडीवर येईल. यामुळे हा सामना रोमांचक होईल यात काही शंका नाही आहे.


कशी असेल खेळपट्टी ?
धर्मशाळा हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियम देशातील सर्वात सुंदर क्रिकेट मैदानांपैकी एक मानला जातो. हा मैदान फलंदाजीसाठी अनुकूल मानला जातो. या सामन्यात ही मोठी धावसंख्या होण्याची अपेक्षा मानली जात आहे.


दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग-XII


पंजाब किंग्स- प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टोयनिस, सूर्यांश शेडगे, मार्को यानसन, लॉकी फर्ग्युसन, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, यश ठाकूर. इम्पॅक्ट प्लेयर: शशांक सिंग.


मुंबई इंडियन्स- रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), नमन धीर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, विल जॅक्स, राज बावा, कॉर्बिन बॉश, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, अल्लाह गजनफर आणि जसप्रीत बुमराह. इम्पॅक्ट प्लेयर: रोहित शर्मा.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून