France Football : फ्रान्सचा वर्ल्ड कप संघ जाहीर; कीलीयन मबंप्पेला कर्णधारपद ,कोलो मुआनी संघाबाहेर

पॅरिस : आगामी 2026 FIFA World Cup साठी फ्रान्सने २६ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. २०२२ च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध हॅटट्रिक मारणाऱ्या किलियन एम्बाप्पेला कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. प्रशिक्षक डिडियर डेशॅम्प्स यांनी अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समतोल करत मजबूत संघ निवडला आहे. एम्बाप्पेसोबत फॉरवर्ड लाईनमध्ये उस्मान डेम्बेले, डेसिरे डौए, मायकेल ओलिस,रायन चेर्की आणि ब्रॅडली बारकोला यांसारख्या आक्रमक खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे फ्रान्सची आक्रमक फळी या स्पर्धेत सर्वात धोकादायक मानली जात आहे.



युवा गोलकीपरला पहिली संधी


घरगुती स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या युवा गोलकीपर रॉबिन रिसरयाची पहिल्यांदाच विश्वचषक संघात निवड झाली आहे. तो माईक मैगनन आणि ब्राईस सांबा यांच्यासोबत गोलकीपर गटात असेल.


कोलो मुआनी संघाबाहेर


गेल्या विश्वचषकात लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या रँडल कोलो मुआनी याला यावेळी संघात स्थान मिळालेले नाही. त्याच्या जागी फॉर्ममध्ये असलेल्या जीन-फिलिप मटेटा याला संधी देण्यात आली आहे.


प्रशिक्षक डेसचॅम्प्ससाठी शेवटची स्पर्धा


२०१८ मध्ये फ्रान्सला विश्वविजेतेपद मिळवून देणारे प्रशिक्षक डिडिएर डेसचॅम्प्स यांच्यासाठी ही शेवटची स्पर्धा ठरणार आहे. त्यांनी या स्पर्धेनंतर फ्रान्स फुटबॉल मुख्य प्रशिक्षकपद सोडण्याची घोषणा केली आहे.





वर्ल्ड कप 2026 साठी फ्रान्सची संपूर्ण टीम


गोलकीपर: माइक मैगनन, ब्राइस सांबा, रॉबिन रिसर।


बचावपटू: लुकास डिग्ने, मालो गुस्टो, लुकास हर्नांडेज, थियो हर्नांडेज, इब्राहिमा कोनाटे, जूल्स कौंडे, मॅक्सन्स लॅक्रोइक्स, विल्यम सलीबा, डेयोट उपामेकानो


मिडफिल्डर्स: एनगोलो कांटे, मनु कोने, एड्रियन रबियोट, ऑरेलियन टचौमेनी, वॉरेन जैरे-एमरी


फॉरवर्ड: मॅग्नेस अक्लिओचे, ब्रॅडली बारकोला, रेयान चेर्की, ओस्मान डेम्बेले, डेसिरे डौए, जीन-फिलिप माटेटा, किलियन एमबाप्पे, मायकल ओलिसे, मार्कस थुरम

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून