IPL 2026 : प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईच्या संघात कुलदीप यादवची एन्ट्री तर RCB मध्येही मोठा बदल

चेन्नई : आयपीएलच्या १९ व्या हंगामात प्लेऑफमध्ये कोणते संघ पोहोचणार याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. आयपीएल २०२६चा हंगाम अंतिम टप्प्याकडे जात असताना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये मोठे बदल झाले आहेत.चेन्नईने दुखापतग्रस्त खलील अहमद याच्या जागी वेगवान गोलंदाज कुलदीप यादवला संघात सामील केले आहे. तर गतविजेत्या आरसीबीने नुवान तुषाराच्या जागी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लेसन याला संघात घेतले आहे.


चेन्नईच्या संघात कुलदीप यादवची एन्ट्री


सीएसकेने खलील अहमदच्या जागी कुलदीप यादवला ३० लाख रुपयांमध्ये संघात घेतले आहे. कुलदीप यादवने यापूर्वी राजस्थान रॉयल्स कडून २०२१ मध्ये आयपीएल पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने आयपीएलमध्ये ३ सामने खेळले असून त्यात २ विकेट घेतल्या आहेत.





आरसीबीमध्ये रिचर्ड ग्लीसन


इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नुवान तुषाराच्या जागी संघात घेतले आहे. ग्लीसनने आयपीएलमध्ये आतापर्यंत २ सामने खेळले असून त्याच्या नावावर २ विकेट आहेत. बंगळुरूने त्याला १.६ कोटी रुपयांत संघात घेतले आहे.ग्लीसनने आंतरराष्ट्रीय स्तरावरही इंग्लंडसाठी ६ टी-२० सामने खेळले असून ९ विकेट घेतल्या आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी १५ धावांत ३ विकेट अशी आहे. ग्लीसन आतापर्यंत १४५ टी-२० सामने खेळला आहे. त्यात त्याने १७० विकेट्स घेतल्या आहेत. टी- २० करियरमध्ये ५/३३ ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून