Kireon Pollard: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! कायरन पोलार्डवर BCCI ची कारवाई

IPL 2026 : यंदाच्या आयपीएलमधील ५८ व्या साखळी सामन्यात अर्थात लीग मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सचा पराभव केला. मुंबईने सामना सहा विकेट राखून जिंकला. या विजयामुळे १२ पैकी ४ सामने जिंकलेल्या मुंबईचे ८ गुण झाले. पंजाब विरुद्ध जिंकले तरी मुंबईला प्लेऑफ खेळता येणार नाही. पण पंजाबसाठी प्लेऑफमध्ये प्रवेश करणे आणखी कठीण झाले आहे. पंजाब विरूद्धच्या विजयामुळे जल्लोष करत असलेल्या मुंबईला बीसीसीआयने मोठा धक्का दिला आहे.


मुंबई इंडियन्सचे फलंदाजी प्रशिक्षक आणि दिग्गज क्रिकेटपटू कायरन पोलार्ड यांच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात बीसीसीआयने कारवाई केली आहे. सामना सुरू असताना पंचाला शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलार्डला दोषी ठरवून त्याच्या सामन्याच्या मानधनातून १५ टक्के रक्कम कापण्यात आली आहे.



नेमकं प्रकरण काय?


मुंबई आणि पंजाब यांच्यातील सामन्यात पोलार्ड यांनी चौथ्या पंचाशी वाद घालताना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. ही घटना मुंबईच्या फलंदाजीदरम्यान १९व्या षटकात घडली. चौथ्या पंचाशी वाद घालताना पोलार्ड यांनी अपशब्द वापरल्याचे समोर आले आहे.सामन्यानंतर झालेल्या सुनावणीत पोलार्ड यांनी आपली चूक मान्य करत दंड स्वीकारला. पोलार्ड सध्या मुंबई संघाचे मुख्य फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या घटनेमुळे त्यांच्या खात्यात एक शिस्तभंग गुण (डीमेरिट पॉइंट) नोंदवला गेला आहे. चार किंवा त्यापेक्षा जास्त शिस्तभंग गुण (डीमेरिट पॉइंट) जमा झाल्यास खेळाडू किंवा प्रशिक्षकावर काही सामन्यांची बंदीही घातली जाऊ शकते. प्रशिक्षक झाल्यानंतर ही त्यांची पहिलीच चूक आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून