Ravi Shastri : 'हाच होणार भारताच्या T20 संघाचा कर्णधार'

मुंबई : भारताच्या टी २० संघाचा कर्णधार कोण होणार यावरून क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण आले आहे. सूर्यकुमार यादवचा हरवलेला फॉर्म बघून बीसीसीआयने नव्या टी २० कर्णधाराबाबत विचार सुरू केला आहे. श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन भारताच्या T20 संघाच्या कर्णधारपदाच्या स्पर्धेत आघाडीवर आहेत. या पार्श्वभूमीवर भारताचे दिग्गज क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक भाकीत वर्तवले आहे. रवी शास्त्री यांनी भारताच्या T20 संघाचा कर्णधार कोण होणार ? या प्रश्नाचे उत्तर देत थेट खेळाडूचे नाव सांगितले आहे.



संजू सॅमसनच्या कामगिरीत सुधारणा होत असताना दिसत आहे. त्याची टी २० वर्ल्डकपमधील कामगिरी प्रभावी आहे. यंदाच्या आयपीएलमधील त्याची कामगिरी बघता तो भारताच्या T20 संघाच्या कर्णधारपदााठी प्रबळ दावेदार ठरू शकतो. संजू सॅमसन सध्या चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळत आहे, तो फलंदाजीसाठी सलामीलाच येत आहे. यंदाच्या हंगामात त्याने चेन्नईसाठी ११ सामन्यांत फलंदाजी करून ४३० धावा केल्या आहेत. यात दोन शतकांचा समावेश आहे. यंदा दिल्ली विरूद्धच्या सामन्यात त्याने नाबाद ११५ धावा केल्या. ही यंदाच्या आयपीएलमधील त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. यामुळे रवी शास्त्री यांनी संजू सॅमसन हाच भारताच्या T20 संघाचा कर्णधार होऊ शकतो असे भाकीत वर्तवले आहे. आयसीसीच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे भाकीत केले आहे.


भारताच्या T20 संघाच्या कर्णधारपदासाठी श्रेयस अय्यर हा पण एक प्रमुख दावेदार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून १२ सामन्यात त्याने ३९६ धावा केल्या आहेत. यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे.यंदाच्या गुणतालिकेत चेन्नई पाचव्या तर पंजाब चौथ्या स्थानी आहे. यामुळे बीसीसीआय आयपीएल पूर्ण झाल्यानंतरच भारताच्या T20 संघाच्या कर्णधारपदाबाबत निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई : दिशा सालियन