NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या पेपरफुटी प्रकरणात आता सीबीआयने अत्यंत महत्त्वाची कारवाई करत शनिवारी एका बायोलॉजीच्या (जीवशास्त्र) प्राध्यापिकेला बेड्या ठोकल्या आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या अत्यंत गोपनीय समितीत या प्राध्यापिकेचा समावेश होता. गेल्या ३ मे रोजी ही वादग्रस्त परीक्षा पार पडली होती. या महाघोटाळ्याचा मुख्य सूत्रधार मानला जाणारा प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी आणि इतर काही आरोपींची सीबीआयने कसून चौकशी केली होती. या सखोल चौकशीतून मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारेच तपास यंत्रणेने या प्राध्यापिकेच्या मुसक्या आवळल्या आहेत.



विषय तज्ज्ञ म्हणून होती नियुक्ती


मनीषा मांढरे असे या अटक करण्यात आलेल्या प्राध्यापिकेचे नाव आहे. दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात तिची प्रदीर्घ काळ चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर तिला अधिकृतरीत्या अटक करण्यात आली. एनटीएने तिची 'विषय तज्ज्ञ' म्हणून नियुक्ती केली होती आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत तिचा थेट व महत्त्वाचा सहभाग होता, अशी धक्कादायक माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.



लाखो रुपयांच्या बदल्यात 'स्पेशल क्लास'


'बॉटनी' (वनस्पतीशास्त्र) आणि 'झुऑलॉजी' (प्राणीशास्त्र) या विषयांच्या प्रश्नपत्रिका हाताळण्याचे संपूर्ण अधिकार मनीषा मांढरेकडे होते. या अधिकारांचा तिने गैरफायदा घेतला. १४ मे रोजी अटक करण्यात आलेली दुसरी आरोपी मनीषा वाघमारे हिच्या मध्यस्थीने मांढरेने एप्रिल २०२६ मध्ये काही विद्यार्थ्यांशी संधान बांधले. त्यानंतर या निवडक विद्यार्थ्यांसाठी पुण्यात स्वतःच्या घरी 'खासगी शिकवणी' सुरू केली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मांढरे हिने लाखो रुपये उकळून या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच प्रश्न आणि त्यांची उत्तरे डिक्टेट (लिहून देणे) केली होती. ३ मे रोजी झालेल्या मुख्य परीक्षेत विद्यार्थ्यांच्या वह्यांमध्ये लिहून दिलेले हेच प्रश्न जसेच्या तसे आल्याचे निष्पन्न झाले. या पेपरफुटीचे पुरावे समोर आल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आणि अखेर ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.



लातूर कनेक्शन आणि पी. व्ही. कुलकर्णीला अटक


तत्पूर्वी, याच पेपरफुटी रॅकेटमधील रसायनशास्त्राचा (केमिस्ट्री) तज्ज्ञ असणाऱ्या प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याला सीबीआयने शुक्रवारी लातूरमधून अटक केली होती. कुलकर्णी हा गेली अनेक वर्षे एनटीएच्या प्रश्नपत्रिका काढणाऱ्या पॅनेलवर सक्रिय होता. कुलकर्णीनेही आपल्या अधिकारांचा गैरवापर करत एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात स्वतःच्या घरी काही विद्यार्थ्यांसाठी 'स्पेशल क्लास' घेतला होता. सीबीआयच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, १४ मे रोजी अटक करण्यात आलेल्या मनीषा वाघमारे हिच्याच माध्यमातून कुलकर्णीने विद्यार्थ्यांची जमवाजमव केली होती आणि त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली होती. या खासगी क्लासेसमध्ये कुलकर्णीने विद्यार्थ्यांना जे प्रश्न, त्यांचे पर्याय आणि उत्तरे लिहून दिली होती, ती ३ मे रोजीच्या 'नीट' प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळली आहेत. विद्यार्थ्यांनी यासाठी अनेक लाख रुपये मोजले होते.



सीबीआयकडून विशेष पथकांची स्थापना


या अत्यंत गंभीर प्रकरणाची दखल घेत सीबीआयने रीतसर प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवला आहे. तसेच, या मोठ्या गुन्ह्याच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी आणि पुढील सखोल तपासासाठी विशेष पथकांची स्थापना केली आहे. देशभरातील ५५१ शहरांसह परदेशातील १४ केंद्रांवर ही अत्यंत महत्त्वाची वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. देशभरातून तब्बल २३ लाख उमेदवारांनी यासाठी नोंदणी केली होती. या सर्व विद्यार्थ्यांच्या भविष्याशी या रॅकेटने खेळ केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, एनटीएने या प्रकरणावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ३ मे रोजी परीक्षा पार पडल्यानंतर चार दिवसांनी, म्हणजेच ७ मे रोजी संध्याकाळी त्यांच्याकडे या गैरव्यवहाराची पहिली माहिती आली होती. या माहितीचे गांभीर्य ओळखून पुढील 'स्वतंत्र पडताळणी आणि आवश्यक कायदेशीर कारवाईसाठी' दुसऱ्याच दिवशी (८ मे) सकाळी हा अहवाल केंद्रीय तपास यंत्रणांकडे सुपूर्द करण्यात आला होता.

Comments
Add Comment

Haridwar Firing News : हरिद्वार हादरले! गुप्तचर विभागाच्या पोलीस अधीक्षकांवर चालकाचा गोळीबार; एम्समध्ये उपचार सुरू, आरोपी अटकेत

हरिद्वार : उत्तराखंडमधील हरिद्वार शहरात शनिवारी एक अत्यंत खळबळजनक आणि संतापजनक घटना घडली आहे. आपल्याच

बर्ड फ्लूवरील स्वदेशी लस बाजारात ! लसीची किंमत ऐकून व्हाल थक्क , अवघ्या...

देशातील पोल्ट्री व्यवसायाशी संबंधित शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोंबड्यांमध्ये वेगाने

NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; सर्व 14 आरोपींवर आरोप निश्चित

NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात दिल्लीच्या फास्ट-ट्रॅक कोर्टाने शनिवारी (21 नोव्हेंबर) मोठा निर्णय दिला. सर्व 14 आरोपींवर

'काश्मीर खोऱ्यात एकही स्थानिक दहशतवादी सक्रिय नाही'; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मोठा दावा

पुलवामामध्ये पोलिसांनी लष्कर ए तोयबाचा एक दहशतवादी ठार केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात कोणताही स्थानिक दहशतवादी

Narendra Modi attack on Congress : “काँग्रेसने फक्त ‘गरिबी हटाव’चा जप केला, आम्ही १२ वर्षांत ५० कोटींना गरिबीतून बाहेर काढले”; वैशालीतून पंतप्रधान मोदींचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी बिहारमधील वैशाली जिल्ह्यात आयोजित जाहीर सभेतून काँग्रेसच्या

PM Modi Nitish Setu inauguration : पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज ‘नीतीश सेतू’चे लोकार्पण; उत्तर आणि दक्षिण बिहारला जोडणाऱ्या सहा पदरी पुलाची खास वैशिष्ट्ये काय ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज शनिवारी बिहारमधील वैशाली जिल्ह्यात गंगा नदीवर बांधलेल्या एका भव्य सहा पदरी