Ranbir Kapoor : रणबीर कपूर झाला अयोध्यावासी! ‘रामायण’ रिलीजआधी राम मंदिराजवळ ३.३१ कोटींची प्रॉपर्टी खरेदी

अयोध्या : रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या बहुचर्चित रामायण (Ramayana) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो प्रभू श्रीरामांची भूमिका साकारत असून, चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. हनुमान जयंतीच्या निमित्ताने निर्मात्यांनी चित्रपटातील रणबीर कपूरच्या प्रभू श्रीरामांच्या भूमिकेची खास झलक प्रदर्शित केली होती. या झलकनंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. मात्र, आता रणबीर कपूर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. चित्रपट रिलीज होण्याआधीच त्याने अयोध्येत मोठी गुंतवणूक करत तब्बल ३.३१ कोटी रुपयांची प्रॉपर्टी खरेदी केली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, रणबीर कपूरने अयोध्येत सुमारे २,१३४ स्क्वेअर फूट जागा खरेदी केली आहे. ही प्रॉपर्टी राम मंदिरापासून अवघ्या २० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या सरयू नदीकिनारी विकसित होत असलेल्या एका प्रीमियम प्रोजेक्टमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रोजेक्टमध्ये आलिशान घरं, आधुनिक क्लब हाऊस, लक्झरी सुविधा आणि नामांकित हॉटेल ब्रँडच्या सेवा देखील उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पाकडे गुंतवणूकदार आणि सेलिब्रिटींचं विशेष लक्ष लागलं आहे.


या प्रॉपर्टी खरेदीबाबत बोलताना रणबीर कपूरने अयोध्येबद्दलच्या आपल्या खास भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, “माझा असा विश्वास आहे की अयोध्येनेच माझी निवड केली आणि मी फक्त त्या हाकेला प्रतिसाद दिला. अयोध्या ही आपल्या इतिहासात आणि संस्कृतीत खोलवर रुजलेली भूमी आहे. सरयूच्या या पवित्र भूमीने माझ्यासाठी एक माध्यम म्हणून काम केलं असून, त्यामुळे ही जागा माझ्या कुटुंबाशी कायमची जोडली जाईल.”


रणबीर कपूरच्या या निर्णयाची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. ‘रामायण’ चित्रपटात प्रभू श्रीरामांची भूमिका साकारत असतानाच अयोध्येत प्रॉपर्टी खरेदी केल्यामुळे अनेक चाहत्यांनी त्याच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

Comments
Add Comment

Rohit Sharma New Reality Show : क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर मारणारा हिटमॅन आता टेलिव्हिजनचा TRP वाढवणार, रोहित शर्माचा नवा रिऍलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सर्वांचा लाडका 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर रोहित शर्मा टीव्हीवर एक नवा रिएलिटी शो घेऊन येत आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या