अभिनयासोबत उद्योगविश्वातही अमृता खानविलकरची भरारी; फोर्ब्स इंडियात नाव

भारताच्या लक्झरी मार्केटमध्ये अनेक कलाकार उद्योजक आपले व्यवसाय करताना दिसत असून अभिनय आणि उद्योग या दुहेरी जवाबदाऱ्या पेलणारे अनेक इंडस्ट्री कलाकार आहेत पण यातलं लक्षवेधी आणि चर्चेत असलेलं नाव म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर !

Amruta Khanvilkar: भारताच्या लक्झरी मार्केटमध्ये अनेक कलाकार उद्योजक आपले व्यवसाय करताना दिसत असून अभिनय आणि उद्योग या दुहेरी जवाबदाऱ्या पेलणारे अनेक इंडस्ट्री कलाकार आहेत पण यातलं लक्षवेधी आणि चर्चेत असलेलं नाव म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर ! फोर्ब्स इंडिया या भारतातील लक्झरी ब्रँड्समधील फाउंडर यादीत अभिनेत्री अमृता खानविलकर हिचे नाव समाविष्ट केले आहे.

नवोदित उद्योजक पुढे येऊन नवे उद्योग सुरू करत असून या उद्योगात नवी दृष्टी घेऊन येत आहेत. काही कलाकारअगदी शून्यापासून ब्रँड उभारत असून फॅशन, वस्त्रोद्योग आणि लाइफस्टाईल या क्षेत्रांमध्ये आज ते स्वतःची वेगळी ओळख संपादन करताना दिसतात, त्यातील एक नाव म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर हीचा ब्रँड 'अमुल्य बाय अमृता'.






2026 मध्ये अमृताने “अमुल्य बाय अमृता” या ब्रॅण्डची स्थापना करून सुरुवात केली आणि अमुल्य हा ब्रँड सुरू होण्याआधीपासूनच तिची या ब्रॅंड सोबत एक भावना होती. जवळपास बारा वर्षांपूर्वी, तिच्या बहिणीच्या लग्नादरम्यान, अमृताला जाणवले की तिच्या कुटुंबातील कोणत्याही महिलेकडे कधीही अस्सल हातमागाची पैठणी नव्हती.

अस्सल पैठण्यांच्या शोधातून सुरू झालेला प्रवास तिच्यासाठी विणकर, पारंपरिक कारागिरी आणि प्रत्येक साडीमागील कथांच्या सुंदर जगाची ओळख ठरला. वैयक्तिक कथा व्यवसायांना यशस्वी करतात, कारण त्या ब्रँडला त्याचा उद्देश, प्रामाणिकपणा आणि ओळख देतात, असे तिला वाटते. अमुल्य बाय अमृता मधून तिला सुंदर, अस्सल साड्या शोधण्याचा तोच अनुभव अधिक महिलांपर्यंत पोहोचवायचा आहे, असे तिने सांगितले आहे. विणकरांसोबत जवळून काम करून, त्यांची कला समजून घेऊन, आणि खास तरीही सहज परवडणारे कलेक्शन तयार करून. अमुल्य ही अमृताची वैयक्तिक कथा आहे, आणि ती तुमच्या कथेचा भागही व्हावी, अशी तिची इच्छा आहे.

अमुल्य बाय अमृताच्या साड्या या बॉलिवूड मध्ये देखील चर्चेत आहेत काही दिवसांपूर्वी धकधक गर्ल माधुरी दीक्षीत यांनी कोण होणार करोडपती ? साठी अमुल्यचा मराठी साज परिधान केला होता तर ऐकीकडे आगामी बहुचर्चित ईठा या चित्रपटासाठी अमृताचा हा मराठमोळा ब्रॅंड ऑफिशल सारी ब्रॅंड ठरला आहे.

रुपेरी पडदा गाजवून सोबतीला व्यवसाय विश्वात स्वतःची अमुल्य ओळख अमृता संपादन करताना दिसत असून येणाऱ्या काळात अमृता हा ब्रँड जगभर नक्कीच घेऊन जाईल यात शंका नाही !
Comments
Add Comment

Akshay Kumar 8 hour shift : 8 तासांच्या शिफ्टमुळे निर्माते कचरतात? अक्षय कुमारने सांगितलं खरं कारण

Akshay Kumar 8 hour shift : बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आणि रवी किशन नुकतेच करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात

Yeh Prem Mol Liya: प्रदर्शनाआधीच आयुष्मानच्या चित्रपटाची कमाई 1 कोटींच्या पार; ॲडव्हान्स बुकिंगला प्रतिसाद

सुरज बडजात्या यांचा 'ये प्रेम मोल लिया' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट २७ नोव्हेंबर रोजी

IFFI 2026 : IFFI 2026 मध्ये ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’चा समारोप; ‘वन लास्ट स्टॉप’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

गोवा : गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) तरुण चित्रपट निर्मात्यांसाठी

गोव्यात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'भाई बँड'ची जोरदार चर्चा; दोन भावांची गोष्ट प्रेक्षकांच्या मनात घर करणार

गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज एका वेगळ्याच धाटणीच्या गुजराती

Dalimb Movie: दोन रहस्यं, एक थरारक तपास! 'डाळिंब'मध्ये जितेंद्र कुमार आणि प्रिया बापटची दमदार जोडी

Dalimb Movie: विविध शैलींमधील दर्जेदार कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची परंपरा कायम ठेवत, हिंदी ZEE5 ने आपल्या आगामी

'कमळी'च्या ऋषीची नवी आवड! निखिल दामलेने 2026 मध्ये वाचनातून जोपासली इतिहासाची गोडी

Nikhil Damle: सरत्या वर्षातील अनुभव, शिकवण आणि आठवणी सोबत घेऊन नव्या वर्षात काही नवीन गोष्टी करण्याचा संकल्प केला जातो.