Akshay Kumar 8 hour shift : 8 तासांच्या शिफ्टमुळे निर्माते कचरतात? अक्षय कुमारने सांगितलं खरं कारण

अक्षयने खुलासा केला की तो आठ तासांचे कामाचे वेळापत्रक पाळतो, ज्यामुळे कधी मोठे निर्माते त्याच्यासोबत काम करण्यास संकोच करतात असे त्याने सांगितले.

Akshay Kumar 8 hour shift : बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आणि रवी किशन नुकतेच करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या शोच्या नवव्या पर्वात अनेक विषयांवर चर्चा करण्यात आले. यावेळी अक्षयने खुलासा केला की तो आठ तासांचे कामाचे वेळापत्रक पाळतो, ज्यामुळे कधी मोठे निर्माते त्याच्यासोबत काम करण्यास संकोच करतात असे त्याने सांगितले. त्याच्या या विधानामुळे सध्या बॉलीवूड विश्वात चर्चा सुरु झाली आहे. या अभिनेत्याने आपल्या कामाच्या पद्धतीची तुलना हॉलिवूड चित्रपट निर्माता क्रिस्टोफर नोलन आणि अभिनेता टॉम क्रूझ यांच्याशीही केली.



आठ तासांच्या कामाच्या शिफ्टबद्दल अक्षय कुमार काय म्हणाला?


एपिसोड दरम्यान, करणने नवोदित दिग्दर्शकांना संधी दिल्याबद्दल आणि निर्माते व दिग्दर्शक म्हणून दोघांचाही विचार केल्याबद्दल अक्षयचे कौतुक केले, तेव्हा अक्षय म्हणाला, “बरेच दिग्गज लोक मला कास्ट करण्यास संकोच करतात. माझ्याबद्दल खूप अफवा आहेत. ते म्हणतात की मी फक्त आठ तास काम करतो. पण ते विसरतात की त्या आठ तासांमध्ये मी माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्येही जात नाही. आमचं काम कॅमेऱ्यासमोर असणं आहे, आणि लोकांना तुम्हाला कॅमेऱ्यासमोर सुंदर पाहायचं असतं, थकलेलं नाही. म्हणून मी विचार केला की मी आठ तास काम करेन, आठ तास झोपेन, दोन तास माझ्या शरीरावर खर्च करेन आणि काही तास माझ्या कुटुंबाला देईल," असे अक्षयने सांगितले.






रवी किशन यांनी काय सांगितले?


चित्रपटाच्या सेटवरील अक्षयच्या वेगाची आणि ऊर्जेची रवी किशन यांनी प्रशंसा केली. त्यांनी सांगितल की, चित्रपट लवकर पूर्ण केल्यामुळे हा अभिनेता निर्मात्यांना पैसे वाचविण्यातही मदत करतो. तसेच अक्षय साधारणपणे 55 दिवसांत एक चित्रपट पूर्ण करतो, ज्यामुळे निर्मात्यांना त्याचा फायदा होतो आणि चित्रपट युनिटमधील 300-400 लोकांना रोजगार मिळतो.


तर याबद्दल अक्षयने खुलासा करत, तो 65 दिवसांत एक चित्रपट कसा पूर्ण करतो याबद्दल अनेक लोक प्रश्न विचारतात. “मी अलीकडेच ख्रिस्तोफर नोलन यांची एक मुलाखत वाचली, आणि त्यावरून असं दिसतंय की त्यांना एक चित्रपट पूर्ण करायला 90 दिवसांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. टॉम क्रूझने ‘मिशन: इम्पॉसिबल’ 55 दिवसांत पूर्ण केला.”



दीपिका पदुकोणच्या आठ तासांच्या शिफ्टच्या मागणीमुळे वाद निर्माण झाला


दरम्यान अभिनेत्री दीपिका पदुकोणने 2025 मध्ये आठ तासांच्या शिफ्टच्या मागणीवरून संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरिट' चित्रपटातून माघार घेतल्याच्या वृत्तामुळे कलाकारांच्या कार्य-जीवन संतुलनाबद्दल चर्चा सुरू झाली. त्यानंतर, 'कल्की 2898 एडी'च्या निर्मात्यांनीही जाहीर केले की दीपिका चित्रपटाच्या सिक्वेलचा भाग असणार नाही. या घोषणेनंतर लगेचच, अभिनेत्रीने आठ तासांच्या कामाच्या शिफ्टची आणि नफ्यात वाटा मागितल्याच्या बातम्या समोर येण्यास सुरुवात झाली.


ऑक्टोबर 2025 मध्ये, दीपिकाने दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आठ तासांच्या कामाच्या मागणीचे समर्थन केले. तिने निदर्शनास आणून दिले की, इंडस्ट्रीतील अनेक पुरुष सुपरस्टार्सनी वर्षानुवर्षे अशाच प्रकारच्या टीकेला सामोरे न जाता आठ तासांची शिफ्ट पाळली आहे. एक स्त्री असल्यामुळे तिची ही मागणी आग्रही वाटू नये. आलिया भट्ट, करण जोहर, नेहा धुपिया आणि इतर अनेक जण या अभिनेत्रीच्या समर्थनार्थ पुढे आले. तोच मुद्दा पुन्हा आता अक्षय कुमारला विचारला असता त्यानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.



अक्षय कुमारचे आगामी चित्रपट


अक्षय कुमार सध्या रोहित शेट्टीच्या 'गोलमाल 5' मध्ये दिसणार आहे. या कॉमेडी फ्रँचायझीच्या पाचव्या भागात अजय देवगण, अर्शद वारसी, कुणाल खेमू, शर्मन जोशी, श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर हे कलाकार असणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू असून, तो 8 जानेवारी 2027 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

Yeh Prem Mol Liya: प्रदर्शनाआधीच आयुष्मानच्या चित्रपटाची कमाई 1 कोटींच्या पार; ॲडव्हान्स बुकिंगला प्रतिसाद

सुरज बडजात्या यांचा 'ये प्रेम मोल लिया' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट २७ नोव्हेंबर रोजी

IFFI 2026 : IFFI 2026 मध्ये ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’चा समारोप; ‘वन लास्ट स्टॉप’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

गोवा : गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) तरुण चित्रपट निर्मात्यांसाठी

गोव्यात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'भाई बँड'ची जोरदार चर्चा; दोन भावांची गोष्ट प्रेक्षकांच्या मनात घर करणार

गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज एका वेगळ्याच धाटणीच्या गुजराती

Dalimb Movie: दोन रहस्यं, एक थरारक तपास! 'डाळिंब'मध्ये जितेंद्र कुमार आणि प्रिया बापटची दमदार जोडी

Dalimb Movie: विविध शैलींमधील दर्जेदार कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची परंपरा कायम ठेवत, हिंदी ZEE5 ने आपल्या आगामी

'कमळी'च्या ऋषीची नवी आवड! निखिल दामलेने 2026 मध्ये वाचनातून जोपासली इतिहासाची गोडी

Nikhil Damle: सरत्या वर्षातील अनुभव, शिकवण आणि आठवणी सोबत घेऊन नव्या वर्षात काही नवीन गोष्टी करण्याचा संकल्प केला जातो.

Pooja Birari New Serial: ‘चुकीच्या गोष्टी खपवून घेत नाही!’ ‘येतेच आता मी नांदायला’मधील शिवानीबद्दल पूजा बिरारी काय म्हणाली?

Pooja Birari New Serial: झी मराठीवरील 'येतेच आता मी नांदायला' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या मालिकेत अभिनेत्री