Pakistan in WTC : षटकारांच्या संथ गतीचा फटका, ICC च्या कारवाईमुळे पाकिस्तान WTC मध्ये आठव्या स्थानी

मुंबई  : आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघावर कडक कारवाई करत मोठा दंड ठोठावला आहे. याचा संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही मोठा फटका बसला आहे. पाकिस्तानी संघ सध्या २०२५-२७ च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप चक्राचा भाग म्हणून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर आहे. पहिला सामना मिरपूरमध्ये खेळला गेला आणि त्यात पाकिस्तानी संघ १०४ धावांनी पराभूत झाला.



आता आयसीसीने मिरपूर कसोटीतील स्लो ओव्हर रेटमुळे पाकिस्तानी संघावर मोठी कारवाई केली असून, यामध्ये त्यांच्या सामना शुल्कावर दंड आकारण्यासोबतच, जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२५-२७ च्या गुणतालिकेतून त्यांचे गुणही मोठ्या प्रमाणात कमी केले आहेत. आधीच पाकिस्तान संघाची कसोटीत अवस्था बिकट असताना आयसीसीने केलेल्या या कारवाईचा संघाला मोठा फटका बसला आहे.



आयसीसीच्या पाकिस्तान संघाला ठोठावलेल्या दंडामधील अहवालात असं म्हटलं आहे की, मिरपूर स्टेडियममध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात त्यांनी निर्धारित वेळेपेक्षा आठ षटकं कमी टाकली. परिणामी, खेळाडूंना त्यांच्या सामना शुल्काच्या ४० टक्के दंड आकारण्यात आला आणि कमी टाकलेल्या प्रत्येक षटकासाठी एक गुण वजा करण्यात आला. यामुळे, पाकिस्तानी संघाने पराभवासाठी केवळ एक गुणच गमावला नाही, तर एकूण आठ गुण गमावले.
आयसीसीच्या या कारवाईनंतर आता, त्यांचे एकूण फक्त ४ गुण शिल्लक आहेत, ज्यामुळे पाकिस्तानी संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ गुणतालिकेत थेट ८व्या स्थानावर पोहोचला आहे, ज्यामध्ये केवळ वेस्ट इंडिज संघ त्यांच्या खाली आहे, ज्यांच्या गुणांची एकूण टक्केवारी ४.१७ आहे.


पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने षटकांचा वेग कमी ठेवल्याबद्दल आयसीसीने संघावर केलेली कारवाई स्वीकारली असून, या प्रकरणात आता कोणतीही पुढील औपचारिक सुनावणी होणार नाही.


मैदानातील पंच रिचर्ड केटलबरो आणि कुमार धर्मसेना, तसेच तिसरे पंच अलाउद्दीन पालेकर आणि चौथे पंच गाझी सोहेल यांनी पाकिस्तानी संघावर स्लो ओव्हर रेटसाठी आरोप केला होता. त्यांच्या तक्रारीनंतर, सामनाधिकारी जेफ क्रो यांनी प्रकरण ऐकून दंडात्मक कारवाई केली. दोन्ही संघांमधील दुसरा कसोटी सामना १६ मेपासून सिल्हेट येथे खेळवला जात आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून