Parth Pawar : पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याचे सूत्रांकडून समजते. या भेटीत राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत बदलांबाबत सुरू असलेल्या मोठ्या राजकीय चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) शनिवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे त्यांच्या अनुक्रमे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या पदांवर पूर्ण अधिकारांसह कायम आहेत, असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक आणि उमेश पाटील यांनी स्पष्ट केले की, केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात या दोन्ही नेत्यांच्या मुख्य पदांचा उल्लेख नव्हता, ती केवळ एक कारकुनी चूक होती. या संदर्भात निवडणूक आयोगाला लवकरच एक नवीन पत्र पाठवून पटेल आणि तटकरे यांच्यासह पक्षातील सर्व जबाबदाऱ्यांची स्पष्ट माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.



अविनाश आदिक आणि उमेश पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला काही तास उलटत नाहीत तोच पार्थ पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे वृत्त आले आहे. याआधी शरद पवारांसोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची चर्चा झाल्याचे वृत्त आले. यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. या पार्श्वभूमीवर अविनाश आदिक आणि उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. नंतर शनिवारी रात्री उशिरा पार्थ पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे वृत्त आले आहे.



निवडणूक आयोगाला २९ एप्रिल रोजी पाठवलेल्या पत्रातील मजकूर जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीशी संबंधित घटनाक्रमाला वेग आला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी २९ एप्रिल रोजी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले. पत्रात नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची मुख्य पदे गायब असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. पत्रात प्रफुल्ल पटेल यांचा उल्लेख 'राज्यसभेचे पक्षनेते' आणि सुनील तटकरे यांचा उल्लेख 'लोकसभेचे पक्षनेते' असा करण्यात आला होता. परंतु, त्यांच्या नावांसमोर 'राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष' आणि 'महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष' या त्यांच्या मूळ संघटनात्मक पदांचा उल्लेख नसल्यामुळे या दोन्ही मोठ्या नेत्यांना पक्षात बाजूला केले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. माध्यमांमधील वृत्तांचे खंडन करताना उमेश पाटील म्हणाले, "प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची पदे आधीसारखीच कायम आहेत. निवडणूक आयोगाकडे गेलेल्या पत्रात केवळ तांत्रिक चूक झाली होती, ज्याचा प्रसारमाध्यमांनी चुकीचा अर्थ काढला. लवकरच नवे सुधारित पत्र आयोगाला पाठवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.



आनंद परांजपे सिल्व्हर ओकवर


शिवसेना नेते आनंद परांजपे हे शरद पवार यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओक बंगल्यावर पोहोचले आहेत. आनंद परांजपे हे मूळचे शिवसैनिक आहेत. ते १४ वर्षे राष्ट्रवादीत होते. पण आता पुन्हा एकदा त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशानंतर पहिल्यांदाच आनंद परांजे शरद पवारांच्या भेटीसाठी गेले आहेत.

Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.