America Air Show : अमेरिकेत एअर शोदरम्यान दोन लढाऊ विमानांची धडक, चारही वैमानिक सुरक्षित, कार्यक्रम रद्द

अमेरिका : अमेरिकेच्या (America Air Show) उत्तर-पश्चिम भागातील इडाहो राज्यात आयोजित करण्यात आलेला ‘गनफायटर स्काइज एअर शो’ रद्द करण्यात आला. माउंटन होम एअर फोर्स बेस येथे एअर शोच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात होण्यापूर्वीच दोन अमेरिकी लढाऊ विमाने एकमेकांना धडकली. या धडकेनंतर दोन्ही विमानांना आग लागली आणि ती मलब्यात परिवर्तित झाली. आश्चर्याची बाब म्हणजे, दोन्ही विमानांतील चारही वैमानिक सुरक्षित आहेत. त्यांना वेळेत विमानातून सुरक्षित बाहेर पडण्यात यश मिळवले. (America Air Show)



सीबीएस न्यूज आणि एनबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, चारही वैमानिकांची प्रकृती स्थिर आहे. तसेच सैन्य तळावर उपस्थित असलेल्या कोणत्याही प्रेक्षकाला किंवा नागरिकाला दुखापत झालेली नाही. हा अपघात अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार रविवारी दुपारी सुमारे १२:३० वाजता घडला. आकाशात रोमांचक प्रात्यक्षिक करत असताना हे फायटर जेट अचानक हवेत एकमेकांवर आदळले आणि खाली कोसळले. जमिनीवर पडताच दोन्ही विमानांना आग लागली. (America Air Show)



अमेरिकी पॅसिफिक फ्लीटच्या नौदल हवाई दलाच्या प्रवक्त्या कमांडर अमेलिया उमयम यांनी सांगितले की, ही इलेक्ट्रॉनिक अटॅक स्क्वाड्रन १२९ मधील अमेरिकी नौदलाची दोन ईए-१८जी ग्रोलर विमाने होती. त्यांनी सांगितले की, दोन्ही विमानांतील चारही वैमानिक सुरक्षित बाहेर पडले असून अपघाताची चौकशी सुरू आहे.कमांडर उमयम यांच्या मते, ईए-१८जी ग्रोलर विमाने व्हिडबे आयलंड, वॉशिंग्टन येथून इलेक्ट्रॉनिक अटॅक स्क्वाड्रन १२९ मध्ये तैनात करण्यात आली होती. यूएस नेव्हीनुसार, प्रत्येक विमानाची किंमत सुमारे ६७ दशलक्ष डॉलर्स इतकी आहे.एअर शोच्या आयोजनाशी संबंधित ‘सिल्वर विंग्स ऑफ इडाहो’च्या मार्केटिंग डायरेक्टर किम सायक्स यांनी सांगितले की, सैन्य तळावर कोणालाही दुखापत झालेली नाही. सर्वजण सुरक्षित आहेत आणि हीच सर्वात महत्त्वाची बाब आहे. या सैन्य हवाई तळाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सांगितले की, अपघातानंतर तात्काळ परिसर सील करण्यात आला. तसेच एअर शोही रद्द करण्यात आला आहे. (America Air Show)





आयोजकांच्या माहितीनुसार, हा लोकप्रिय एअर शो विमानवाहतुकीच्या इतिहासाचा उत्सव मानला जातो आणि यात आधुनिक सैनिकी क्षमतांची झलक पाहायला मिळते. यामध्ये हवाई प्रात्यक्षिके आणि पॅराशूट जंपचाही समावेश असतो. यूएस एअर फोर्सचे फ्लाइट डेमॉन्स्ट्रेशन स्क्वाड्रन ‘थंडरबर्ड्स’ हे दोन्ही दिवस या शोचे मुख्य आकर्षण असणार होते. माउंटन होम पोलिसांनी एअर शो रद्द करण्यात आल्याची घोषणा केली असून नागरिकांना सैन्य तळाच्या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.(America Air Show)

Comments
Add Comment

Fighter Jet Crash : फ्रान्समध्ये ‘मिराज 2000 डी’ लढाऊ विमान कोसळले; एकाचा मृत्यू, दुसरा बेपत्ता

पॅरिस: फ्रान्सच्या पूर्वेकडील भागात हवाई तळावर उतरण्याच्या तयारीत असताना ‘मिराज 2000 डी’ हे लढाऊ विमान कोसळल्याची

PoK Protest : दडपशाहीविरोधात PoK पेटणार? जनआंदोलनामुळे पाकिस्तानची चिंता वाढली

इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओजेके) परिस्थिती पुन्हा एकदा स्फोटक बनली आहे. वाढत्या महागाई,

Orangutan rescue Odisha : ओडिशातून तस्करीत सापडलेली ५ ओरंगउटान पिल्ले लवकरच परतणार मायदेशी!

चेन्नई : इंडोनेशियाच्या (Indonesia) जंगलांतून बेकायदेशीरपणे तस्करी करून भारतात आणलेली पाच गोंडस ओरंगउटानची (Orangutans)

Russia Ukraine War : पुतिन जिंकले, ट्रम्प हरले? रशिया-युक्रेन युद्धावर अमेरिकेचा सर्वात मोठा युटर्न

वॉशिंग्टन: चार वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

France Protest : आंदोलनाच्या आगीत ऐतिहासिक वास्तू भस्मसात; फ्रेंच नागरिकांमधून तीव्र संताप आणि दुःख

 France Protest :  फ्रान्समधील अनेक शहरांमध्ये हिंसाचार, जाळपोळ आणि लुटमार सुरू आहे. पॅरिससह दहा शहरांमध्ये हिंसाचार

Colombia Mining Accident: सोन्याच्या हव्यासातून भीषण दुर्घटना? कोलंबियात खाण कोसळली; 14 जणांचा मृत्यू

बोगोटा : नारिन्यो भागात घडलेल्या या दुर्घटनेने पुन्हा एकदा अवैध खाणकामांचा धोका आणि तिथल्या भीषण वास्तवावर