Cannes Film Festival 2026 : कान्सच्या रेड कार्पेटवर झळकली मराठी संस्कृती; अशोक आणि निवेदिता सराफ यांचा खास लूक!

फ्रान्स : जगभरात सध्या ७९ व्या ‘कान्स फिल्म फेस्टिवल २०२६’ची जोरदार चर्चा रंगली आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूड कलाकारांसोबत यंदा मराठी कलाकारांनीही कान्सच्या रेड कार्पेटवर दमदार उपस्थिती लावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे मराठी मनोरंजनविश्वातील लाडकी जोडी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी ‘कान्स फिल्म फेस्टिवल’मध्ये हटके अंदाजात एन्ट्री करत मराठी संस्कृतीचा झेंडा जागतिक स्तरावर फडकावला.



कान्सच्या रेड कार्पेटवर अशोक मामा आणि निवेदिता सराफ यांची एन्ट्री होताच उपस्थितांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. दोघांनीही पूर्णपणे मराठमोळा आणि पारंपरिक लूक करत महाराष्ट्राच्या संस्कृतीची खास झलक जगासमोर सादर केली. अशोक मामांनी पांढऱ्या रंगाचा एलिगंट सूट, काळी पँट आणि साधा पण रुबाबदार लूक केला होता. रेड कार्पेटवर येताच त्यांनी हात जोडून सर्वांना नमस्कार केला. त्यांच्या या साधेपणाने आणि संस्कृती जपणाऱ्या कृतीने चाहत्यांची मनं जिंकली असून सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


तर दुसरीकडे निवेदिता सराफ यांनी नेसलेल्या आकर्षक पैठणीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक दागिने, केसांमध्ये माळलेला गजरा आणि मराठमोळा साज यामुळे त्यांचा लूक अधिकच खुलून दिसत होता. कान्सच्या रेड कार्पेटवर त्यांनी मराठी संस्कृतीची सुंदर ओळख करून दिली. त्यांच्या या एलिगंट आणि पारंपरिक अंदाजाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.






विशेष म्हणजे अशोक मामा आणि निवेदिता सराफ यांनी एकमेकांचा हात धरत अतिशय रोमँटिक आणि गोड अंदाजात रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. त्यांच्या या क्यूट केमिस्ट्रीने चाहत्यांची मनं जिंकली. अनेक नेटकऱ्यांनी या जोडीला “मराठी इंडस्ट्रीचं पॉवर कपल” म्हणत कौतुक केलं आहे. दोघांनीही मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गाजलेले चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.


दरम्यान, ‘कान्स फिल्म फेस्टिवल २०२६’मध्ये मराठी मनोरंजनविश्वातील इतर कलाकारांचीदेखील उपस्थिती पाहायला मिळाली. अभिनेता पुष्कर जोग, अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर यांनीही कान्समध्ये हजेरी लावत मराठी इंडस्ट्रीचा गौरव वाढवला. मराठी कलाकारांची ही जागतिक पातळीवरील चमक पाहून चाहत्यांमध्ये अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.






Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’