Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मंत्री नितेश राणे यांचा मेट्रोने प्रवास

मुंबई : जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी पुन्हा एकदा इंधन बचतीसाठी पुढाकार घेतला. आपल्या विभागाच्या नियोजित बैठकांना उपस्थित राहण्यासाठी मंत्री राणे यांनी मुंबई मेट्रोने प्रवास करत मंत्रालय गाठले.



नितेश राणे यांनी मुंबई अंतर्देशीय विमानतळ टी-१ मेट्रो स्टेशन ते चर्चगेट मेट्रो स्टेशन दरम्यान सर्वसामान्य मुंबईकरांसोबत मेट्रोने प्रवास केला. इंधन बचतीसाठी त्यांनी आपल्या शासकीय गाड्यांचा ताफा बाजूला ठेवून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणे पसंत केले. एका कॅबिनेट मंत्र्याने सुरक्षेचा कोणताही बडेजाव न बाळगता मेट्रोने प्रवास केल्याने प्रवाशांनीही कौतुक करीत त्यांच्यासोबत सेल्फी काढले. दरम्यान, चर्चगेट स्थानकात उतरल्यानंतरही त्यांनी पायी मंत्रालय गाठले.


गेल्या आठवड्यात १४ मे रोजी मंत्री नितेश राणे यांनी 'सुवर्णगड' या आपल्या शासकीय निवासस्थानापासून ते मंत्रालयापर्यंत पायी प्रवास केला होता. राणे यांनी यापूर्वीच आपल्या मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास विभागाच्या सर्व प्रशासकीय बैठका 'ऑनलाइन' पद्धतीने घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांचा प्रवासाचा खर्च आणि वेळ वाचत आहे. आता स्वतः मंत्र्यांनीच मेट्रोने प्रवास करून प्रशासनासमोर आणि नागरिकांसमोर आदर्श ठेवला आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी