Badlapur Crime : बदलापूरमधील पीडित चिमुकलींच्या शिक्षणाची जबाबदारी अखेर सरकारने उचलली!

घोषणेनंतर तब्बल दोन वर्षांनी दहावीपर्यंतचे शुल्क मंजूर; 'आरटीई'अंतर्गत शाळांना थेट निधी देणार


मुंबई : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या बदलापूर अत्याचार प्रकरणातील दोन्ही पीडित अल्पवयीन मुलींच्या शिक्षणाची संपूर्ण आर्थिक जबाबदारी अखेर राज्य सरकारने उचलली आहे. या घटनेनंतर तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी तातडीच्या मदतीची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी दोन वर्षे लागली. आता दोन्ही चिमुकलींच्या दहावीपर्यंतच्या शिक्षण शुल्काला मंजुरी देण्यात आली असून, त्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये, यासाठी 'आरटीई'अंतर्गत शाळांना थेट निधी देण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.



बदलापूरच्या दुर्दैवी घटनेनंतर तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी पीडित मुलींच्या शासकीय मदतीची आणि मोफत शिक्षणाची मोठी घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात दोन वर्षे उलटूनही शासनाकडून कोणतीच फी भरली जात नसल्याचा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केला होता. ही बाब समोर येताच शासकीय पातळीवर वेगाने हालचाली झाल्या. नव्या निर्णयानुसार, 'निर्भया क्रमांक १' हिचे पहिली ते दहावीपर्यंतचे आणि 'निर्भया क्रमांक २' हिचे सिनिअर केजी ते दहावीपर्यंतचे सर्व शैक्षणिक शुल्क सरकार अदा करणार आहे. हे शुल्क संबंधित शाळांना वेळेत मिळवून देण्याची कायदेशीर आणि प्रशासकीय जबाबदारी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.


बदलापूर पूर्वेतील आदर्श विद्यालय या नामांकित शाळेमध्ये ऑगस्ट २०२४ मध्ये एका चार वर्षांच्या आणि एका सहा वर्षांच्या चिमुरडीवर शाळेतील कंत्राटी शिपाई अक्षय शिंदे याने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. १२ ऑगस्ट २०२४ रोजी एका मुलीसोबत, तर १३ ऑगस्टला दुसऱ्या चिमुरडीला लघुशंकेच्या बहाण्याने स्वच्छतागृहात नेऊन तिच्यासोबत हे दुष्कृत्य करण्यात आले होते. दोन्ही मुलींनी शाळेत जाण्यास तीव्र नकार दिल्यानंतर कुटुंबीयांनी विचारपूस केली व वैद्यकीय तपासणीत हा गंभीर प्रकार उघडकीस आला होता.


आरोपीचा एन्काउंटर

१६ ऑगस्ट २०२४ रोजी पीडितांच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली, मात्र गुन्हा दाखल करण्यास स्थानिक पोलिसांनी तब्बल १२ तासांचा विलंब केल्यामुळे बदलापुरात तीव्र जनक्षोभ उसळला होता. हजारो नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर उतरून 'रेल रोको' करत उग्र आंदोलन केले होते. या जनआक्रोशानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी अक्षय शिंदेला अटक केली. मात्र, २३ सप्टेंबर २०२४ रोजी या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले. तळोजा कारागृहातून पुढील चौकशीसाठी ट्रान्झिट रिमांडवर घेऊन जात असताना, आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांचे शस्त्र हिसकावून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरात पोलिसांच्या गोळीबारात त्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला होता.

Comments
Add Comment

IND vs WI: वेस्ट इंडिजसमोर भारताचा 'अभेद्य किल्ला'! 7 वर्षांचे वर्चस्व राखण्याचे टीम इंडियासमोर आव्हान

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा निर्णय शेवटच्या सामन्यावर येऊन ठेपला आहे. 17

Yo Yo Honey Singh : 'यो यो हनी सिंग'च्या अडचणीत मोठी वाढ! आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलचा मोठा दणका

प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार हिरदेश सिंग, ज्यांना जगभर 'यो यो हनी सिंग' (Yo Yo Honey Singh) या नावाने ओळखले जाते, त्यांच्यामागील

Prime Video Chaar Yaar : प्राइम व्हिडिओच्या ‘चार यार’चा ट्रेलर प्रदर्शित; २००० च्या दशकातील मुंबईत उलगडणार गुन्हेगारी आणि मैत्रीची अनोखी कहाणी!

एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल्ससाठी ओळखली जाणारी भारतातील आघाडीची स्ट्रीमिंग सेवा प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

पुरूष क्रिकेटपटूंनाही जे जमलं नाही, ते स्मृती मंधाना करणार! फक्त 133 धावा करताच रचणार ऐतिहासिक महाविक्रम

[caption id="attachment_1066855" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या

Nashik News : सरकारी कार्यालयातच महिला अधिकाऱ्याने संपवलं जीवन , नाशिकमध्ये खळबळ

Malegaon News : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मालेगाव शहरातील सहकार निबंधक कार्यालयातील