Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली. साखरपुड्याच्या सोहळ्यासाठी वऱ्हाडी घेऊन जाणाऱ्या एका आयशर ट्रकला कंटेनरने समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ११ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघांचा धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.






डहाणू तालुक्यातील बापू गाव (खडकीपाडा) येथील बाळाराम जयराम दांडेकर यांचा साखरपुडा धानोरी येथे आयोजित करण्यात आला होता. वऱ्हाडी ट्रकमधून जात असताना मुलीच्या घरापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर अपघात झाला आणि दोन्ही वाहने रस्त्यावरच उलटली. स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.






अनेक प्रवासी ट्रकखाली अडकले होते. सुरुवातीला सर्व जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालय तसेच वापी येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. या दुर्घटनेमुळे साखरपुड्याचा आनंद क्षणात दुःखात बदलला. अपघात प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.



मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत


मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघरच्या धानोरी येथे एका टेम्पोला कंटेनरने धडक दिल्यामुळे झालेला हा भीषण अपघात अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारा आहे. ही घटना ऐकून मला अतिशय दुःख झाले. अपघातात प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. तसेच या अत्यंत कठीण प्रसंगी राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या दुर्दैवी घटनेतील प्रत्येक मृताच्या वारसाला राज्य सरकारतर्फे ५ लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात येईल, तसेच जखमींच्या उपचाराचा खर्चही केला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.


मृतांची नावे


सुरेखा सना लाखाण


पांडू गणपत लाखाण


कलू रोहिदास लाखाण


सुनील अर्जुन धोडकर


चिमा गोविंद बहेडा


नानीमा विठ्ठल धोडकर


सारिका संतोष लाखाण


आयुष विनायक लाखाण


सागर नामदेव थोडे


वंदना शिवराम वळवी


सलोनी शिवराम वळवी


उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या दोन नागरिकांच्या नावांची पडताळणी प्रशासनाकडून सुरू आहे

Comments
Add Comment

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली