अशोक खरातला अटक करण्यास 'ईडी'ला न्यायालयाची परवानगी

नाशिक : धार्मिक विधी आणि पूजेच्या नावाखाली व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाला अशोक खरातला अटक करण्याची रीतसर परवानगी दिली आहे. खरातला मंगळवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते, जिथे ईडीने त्याच्या अटकेची मागणी केली जी न्यायालयाने मान्य केली. आता उद्या, बुधवारी (२० मे) सकाळी ११:३० वाजेपर्यंत त्याला पुढील रिमांडसाठी पुन्हा न्यायालयात हजर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


सुनावणीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर खरातच्या काळ्या कारनाम्यांचा मोठा खुलासा करताना सांगितले की, त्याने भक्तांच्या व इतरांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून अहिल्यानगरमधील राहता येथील समता पतसंस्थेत १०० हून अधिक आणि नाशिकच्या सिन्नर येथील जगदंबा पतसंस्थेत ३२ अशी एकूण ६१ हून अधिक बनावट बँक खाती उघडली होती; ज्यांवर तो स्वतःच 'नॉमिनी' (वारसदार) म्हणून ही खाती हाताळत होता आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर 'हवाला रॅकेट' चालवत होता."या तपासातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, खरातने उघडलेल्या या बनावट खात्यांमध्ये चाकणकर भगिनींसह आरटीओ, महसूल आणि आयकर विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्व संशयितांना ईडीने यापूर्वीच चौकशीसाठी समन्स बजावले असून त्यांचीही कसून चौकशी केली जात आहे.



मूळ गुन्हा काय आहे?


अशोक खरात विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात व्यावसायिक राजेंद्र जासूद यांच्या तक्रारीवरून मूळ गुन्हा (प्रेडिकेट ऑफेन्स) दाखल आहे. याच गुन्ह्याचा आधार घेत ईडीने त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा खटला दाखल केला आहे. तक्रारीनुसार, पूजेअर्च्या आणि विविध धार्मिक विधींच्या नावाखाली खरातने जासूद यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले होते. एवढेच नव्हे, तर खरातने स्वतःच्या फार्महाऊससाठी लागणारे अत्यंत महागडे फर्निचरही जासूद यांच्याच पैशांमधून खरेदी केले होते.


सीए च्या माध्यमातून आर्थिक व्यवहार


तपासादरम्यान व्यावसायिक राजेंद्र जासूद, दिनेश परब आणि सीए ललित पोफळे यांच्याशीही खरातचे थेट आर्थिक संबंध असल्याचे उघड झाले आहे. सीए ललित पोफळे याच्या माध्यमातून खरात नॉमिनी असलेल्या बँकांमध्ये कोट्यवधींचे संशयास्पद आर्थिक व्यवहार झाले आहेत. याशिवाय राहता बँक आणि समता बँकेतील त्याच्या खात्यांचीही ईडीकडून सखोल चौकशी सुरू आहे

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'