उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एअर इंडियाच्या प्रवासी विमानाने दिल्लीला रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला शिंदे यांचा प्रतिसाद


खाजगी विमानाऐवजी प्रवासी विमानाला दिले प्राधान्य


मुंबई:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या नियोजित दिल्ली दौऱ्यासाठी खाजगी विमानाऐवजी एअर इंडियाच्या प्रवासी विमानातून करण्याचा निर्णय घेतला. आज दुपारी ४ वाजताच्या एअर इंडियाच्या प्रवासी विमानाद्वारे मुंबईहून दिल्लीला रवाना झाले.


यावेळी शिंदे यांचे मुंबई विमानतळावर उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी अनेकांनी त्यांच्यासोबत फोटो काढून घेतले. तर काहींनी त्यांना भेटून आपले निवेदन त्यांच्या हाती दिले. या सर्वांना भेटून त्यांचे अभिवादन स्वीकारत शिंदे यांनी आपले विमान गाठले.केंद्रीय नगरविकास विभागाच्या वतीने दिल्लीत स्वच्छ भारत मिशन अर्बन २.० ची विशेष आढावा बैठक आज आणि उद्या दिल्लीत आयोजित केली आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी शिंदे आज दुपारी दिल्लीला रवाना झाले. उद्या ते स्वतः या बैठकीत सहभागी होणार आहेत. एरवी खाजगी विमानाने प्रवास करणाऱ्या शिंदे यांनी यावेळी मात्र सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे प्रवासी विमानाने दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला.



जागतिक बाजारपेठेत तेलाचा किंमती वाढल्याने भविष्यातील धोका ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचा संदेश दिला होता. या संदेशाचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी देशातील आपल्या राजकीय सहकाऱ्यांनाही केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत विशेष बैठक घेऊन राज्यातील सर्व मंत्र्यांसाठी नियमावली जाहीर केली होती.यानंतर शिंदे यांनी या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी तत्काळ ईव्ही गाडी वापरण्याचा निर्णय घेतला. तसेच आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या देखील कमी केली. त्याचप्रमाणे हेलिकॉप्टरने होणारे आपले दौरे देखील कमी केले असून, आता तर खाजगी विमानाने प्रवास न करता एअर इंडियाच्या प्रवासी विमानाने प्रवास करण्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचे पालन करण्यात उपमुख्यमंत्री शिंदे कोणतीही कसूर बाकी ठेवत नाहीत हेच त्यांचा या छोट्याशा कृतीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय; सन २०२९ पर्यंत राज्य नशामुक्त करणार – मुख्यमंत्री फडणवीस

Mumbai : मुंबई येथील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या विकासाशी आणि जनहिताशी संबंधित चार मोठे निर्णय घेण्यात

Nashik : बनावट पैठणी विक्रीला बसणार चाप, 'त्या' निर्णयाचे नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीकडून स्वागत

Nashik District Consumer Council : ग्राहकांची अस्सल पैठणी खरेदी करताना होणारी फसवणूक रोखण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाने पैठणी

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून

Nashik : डेंग्यू-मलेरियाविरोधात मनपाचा पुन्हा ‘घराघरांत’ धडक मोर्चा

Nashik : डेंग्यू, मलेरिया आणि स्वाइन फ्लूचा वाढता धोका लक्षात घेऊन नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) प्रशासनाने

Nashik Crime : दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, चौघे जेरबंद

Nashik Crime : गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या दिवसा घरफोडीच्या मालिकेचा अखेर

PM Modi SCO Summit 2026 : दहशतवादावर पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला थेट संदेश; ‘दहशतवादाबाबत दुहेरी मापदंड नको’

बिश्केक : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) २६व्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी