नसरापूरप्रकरणी २१ मेपासून विशेष न्यायालयात सुनावणी

पुणे : नसरापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी पुणे येथील विशेष न्यायालयात २१ मेपासून नियमित सुनावणी सुरू होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या खटल्याचे गांभीर्य आणि पीडितेचे वय लक्षात घेऊन ही सुनावणी इन कॅमेरा पद्धतीने घेतली जाणार आहे. जिल्हा न्यायाधीश व विशेष सत्र न्यायाधीश एस आर साळुंखे यांच्या विशेष न्यायालयात कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही कायदेशीर प्रक्रिया पार पडेल. ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने अवघ्या १४ दिवसांत तब्बल ११०० पानांचे भक्कम दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. हे दोषारोपपत्र सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक रिपोर्ट, वैद्यकीय अहवाल आणि पीडितेला आरोपीसोबत शेवटचे पाहिल्याचा साक्षीदारांचा पुरावा यावर आधारलेले आहे.



विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सांगितले की या तपासात उच्च दर्जाची तांत्रिक पद्धत अवलंबून तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्यात आला आहे. खटल्याच्या सुरुवातीलाच न्यायालयाने घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करावी अशी विनंती ॲड अजय मिसर यांच्यामार्फत करण्यात आली आहे. हा खटला विक्रमी वेळेत पूर्ण करून आरोपीला कठोर शासन मिळवून दिले जाईल आणि पीडितेच्या कुटुंबाला न्याय दिला जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी