Russia-China Conflict : रशियाकडून चिनी मालवाहू जहाजावर हल्ल्याचा युक्रेनचा दावा; आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ

जगभरात खळबळ उडवणारी एक मोठी घटना समोर आली आहे. युक्रेनने गंभीर आरोप करत दावा केला आहे की, रशियन ड्रोन हल्ल्यात चिनी मालकीच्या जहाजालाही लक्ष्य करण्यात आले आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली असून रशिया आणि चीनच्या संबंधांवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


विशेष म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) लवकरच चीन दौऱ्यावर जाणार असल्याची चर्चा असताना हा कथित हल्ला झाल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.



माध्यमांच्या वृत्तानुसार, काळ्या समुद्र परिसरात रशियन ड्रोन हल्ल्यादरम्यान दोन नागरी जहाजांना लक्ष्य करण्यात आले. युक्रेनच्या बंदर प्रशासनाने सांगितले की, या जहाजांपैकी एक मार्शल आयलंड्सच्या ध्वजाखाली कार्यरत होते, तर दुसरे गिनी-बिसाऊच्या ध्वजाखाली होते. दोन्ही जहाजे ओडेसा बंदराच्या दिशेने जात होती.


युक्रेनियन नौदलाने दावा केला की, चिनी मालकीचे ‘केएसएल देयांग (KSL Deyang)’ हे मालवाहू जहाजही या हल्ल्यात नुकसानग्रस्त झाले. जहाजावर चिनी कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेनियन अधिकाऱ्यांनी जहाजाच्या नुकसानीचे काही फोटोही प्रसिद्ध केल्याचा दावा केला जात आहे.







दरम्यान, पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आधीच जागतिक समुद्री मार्गांवर संकट निर्माण झाले आहे. होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात जहाजांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम होत आहे. अशातच आता काळ्या समुद्रात घडलेल्या या घटनेने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.


ओडेसा हे युक्रेनसाठी अत्यंत महत्त्वाचे सागरी आणि व्यापारी केंद्र मानले जाते. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरू झाल्यापासून या भागात सातत्याने हल्ले होत आहेत. मात्र, चिनी मालकीच्या जहाजाचे नाव समोर आल्याने या प्रकरणाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.



या दाव्यांवर अद्याप रशियाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच चीननेही या घटनेवर मौन बाळगले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे नेमके स्वरूप काय, याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

WhatsApp : परदेशात गेल्यावर सिम कार्डची कटकट कायमची बंद होणार? व्हॉट्सॲप आणतंय 'हे' धमाकेदार फीचर!

परदेश प्रवास करणार्‍यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या

Germany Strange Rules: बागेत बाकावर बसून रडणाऱ्या महिलेला दंड! जर्मनीतील अजब नियम चर्चेत

Germany Strange Rules: कधीकधी, आपण एकटे असतो, अस्वस्थ वाटत असते, तेव्हा कोणाशीतरी बोलण्याऐवजी थोडा वेळ एकटे बसावेसे वाटते.

16 डिसेंबरपूर्वी बांगलादेशात महाभूकंप! हसीनांच्या निकटवर्तीयांना अटक; 108 तुकड्या तैनात झाल्याने खळबळ

ढाका : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बांगलादेशात परतण्याच्या नियोजित दौऱ्याला काहीच काळ शिल्लक असताना, तारिक

इंडोनेशियात बेकायदा सोन्याच्या खाणीत पाणी शिरलं; 13 कामगारांचा मृत्यू, 13 बेपत्ता

इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात एका अनधिकृत सोन्याच्या खाणीत पाणी शिरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या

पोलिश तरुणी वंदे भारत पाहून थक्क! चहा-पोह्याचा आस्वाद घेत रचला व्हायरल व्हिडिओ; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचा आणि बदलत्या स्वरूपाचा अनुभव आता परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. पोलंडमधील एका

Senator speech holding 6 month baby parliament : ६ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सिनेटरचे संसदेत भाषण; लिडिया थॉर्पसोबत चिमुकलीचा लपाछपीचा खेळ, भावूक व्हिडिओ व्हायरल

मुंबई : राजकीय सभागृहाचे कामकाज म्हटले की तणावपूर्ण चर्चा, खडाजंगी आणि कडक शिस्त असेच चित्र नेहमी पाहायला मिळते.