Chandrashekhar Bawankule: कुणबी दाखले देताना ओबीसी-मराठा समाजावर अन्याय नको!

मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत बावनकुळेंचे निर्देश; ओबीसी वसतीगृहांसाठी दरवर्षी ५०० कोटींच्या अतिरिक्त निधीबाबत चर्चा


मुंबई : "राज्यात कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया सुरू असताना, कोणत्याही परिस्थितीत मूळ इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि मराठा समाजावर अन्याय होणार नाही, याची काटेकोर दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे," असे निर्देश मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिले.


राज्यातील ओबीसी समाजाचे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक प्रश्न आणि विविध प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी मंत्रालयात उच्चस्तरीय मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. मंत्रालयात झालेल्या या बैठकीला उपसमितीचे सदस्य आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, वनमंत्री गणेश नाईक, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ सचिव उपस्थित होते.बैठकीत राज्यातील ओबीसींच्या शासकीय नोकऱ्यांमधील प्रतिनिधित्वाबाबत आकडेवारी मांडण्यात आली आली. राज्यात ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण लागू असूनही प्रत्यक्षात सरकारी सेवांमध्ये ओबीसी कर्मचाऱ्यांचे प्रमाण केवळ ९.५० टक्केच असल्याची बाब समोर आली आहे. यावर चिंता व्यक्त करत, या संदर्भातील सविस्तर आणि अद्ययावत माहिती तातडीने गोळा करण्याचे निर्देश महसूल मंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.


ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरावर शासकीय वसतीगृहे उभारण्याच्या कामाला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. विभागीय स्तरावरील वसतीगृहांच्या बांधकामासाठी दरवर्षी किमान ५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. तसेच, 'ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना' आणि ओबीसी शासकीय वसतीगृहातील लाभार्थी विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या वाढवण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले.


महामंडळांचे बळकटीकरण होणार


अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर 'इतर मागास आर्थिक विकास महामंडळा'मार्फत नवीन योजना राबवणे आणि 'महाज्योती'च्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दोन्ही घटकांच्या संचालक मंडळांच्या नियुक्त्या तातडीने करण्याबाबत चर्चा झाली. 'सारथी'च्या धर्तीवर 'महाज्योती'साठी पुणे येथील शिवाजीनगरमधील दुग्ध व्यवसाय विभागाची जागा प्रादेशिक कार्यालय, स्पर्धा परीक्षा केंद्र आणि ग्रंथालयासाठी हस्तांतरित करण्याबाबत चर्चा झाली. तसेच, नाशिकच्या 'मेरी' परिसरातील सर्वे क्र. ११७ मधील जागेवर महाज्योतीच्या प्रादेशिक कार्यालयाचे बांधकाम सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला.महात्मा जोतीराव फुले यांच्या आगामी २०० व्या जयंती वर्षानिमित्त महाज्योतीमार्फत राज्यभरात विविध लोकोपयोगी आणि शैक्षणिक योजना राबवण्याबाबतचे नियोजन या बैठकीत करण्यात आले.याशिवाय, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनी प्रशिक्षणासाठी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे शासकीय जागा उपलब्ध करून देण्याबाबतही बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी १० आणि १६ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावाही याप्रसंगी घेण्यात आला.

Comments
Add Comment

Trump Ukraine : ट्रम्प यांचा युक्रेनला दुहेरी धक्का! रशियाकडून तेल खरेदी अन् स्टारलिंकवर निर्बंध?

वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडवून देत अमेरिकेने युक्रेनला एकाच वेळी दोन मोठे धक्के दिले आहेत.

Crime News : ठाण्यात खतरनाक प्रकार! १७ वर्षीय मित्राची हत्या करून मृतदेह जाळला अन् थेट पोलीस चौकीजवळच पुरला

ठाणे : महाराष्ट्रातील ठाणे (Thane Crime News) शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि अंगावर का आणणारी घटना समोर आली आहे. ठाण्यातील

माफी नाही! निळ्या ड्रम हत्याकांडानंतर आता 'साप कांडा'तील दोषींनाही फाशी, मेरठ न्यायालयाचा निर्णय

निळ्या ड्रम हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर अवघ्या दोन दिवसात आणखी एका प्रकरणात

सायबर सिक्युरिटीमध्ये करिअरची संधी? NISM चे 2 नवीन कोर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : आर्थिक आणि तांत्रिक सुरक्षेला बळ देण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्सने (एनआयएसएम) एक

Nashik : नाशिकमध्ये वाहनांच्या ई-लिलावाची प्रक्रिया, वाहनधारकांनी थकीत कर तातडीने भरावा

नाशिक : प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत (RTO) आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये १५ वर्षे पूर्ण झालेली

Yemen Attack : मध्यपूर्वेत युद्धाचा भडका? येमेनमधील राजवाड्यावरील हल्ल्याने खळबळ

सना : मध्यपूर्वेतील भू-राजकीय संघर्षाला पुन्हा एकदा तीव्र उधाण आले असून, येमेनमध्ये हुती बंडखोरांनी थेट