Water Shortage : राज्यातील १५ जिल्ह्यांत पाणीटंचाई

६३३ गावे, १ हजार ६५२ वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू


मुंबई : राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. सध्या १५ जिल्ह्यांतील ६३३ गावे आणि १६५२ वाड्यांमध्ये एकूण ७०६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या टँकरमध्ये ३३ शासकीय तर ६६९ खासगी टँकरचा समावेश आहे. वाढत्या तापमानामुळे विहिरी, बोअरवेल आणि लहान पाणीस्त्रोत कोरडे पडू लागल्याने अनेक ग्रामीण भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.ठाणे विभागात सर्वाधिक १७७ गावे आणि ५७२ वाड्यांमध्ये १५५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर नाशिक विभागात १५६ गावे आणि ४४४ वाड्यांसाठी १५९ टँकर कार्यरत आहेत. पुणे विभागात १४५ गावे आणि ५७२ वाड्यांमध्ये १३१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.


छत्रपती संभाजीनगर विभागात १३८ गावे आणि ६४ वाड्यांसाठी एकूण २४४ टँकर कार्यरत असून राज्यातील सर्वाधिक टँकर या विभागात वापरण्यात येत आहेत. अमरावती विभागात १७ गावांसाठी १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नागपूर विभागात सध्या कोणत्याही ठिकाणी टँकरची आवश्यकता भासलेली नाही.राज्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायती आणि पाणीपुरवठा विभाग यांच्याकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांना नियमित आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असून टँकर पुरवठ्याबरोबरच पर्यायी जलस्रोतांचा वापर, विहिरींचे अधिग्रहण आणि जलसाठ्यांचे नियोजन यावरही भर दिला जात आहे.आगामी काळात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने पाणीटंचाईग्रस्त भागांमध्ये आवश्यकतेनुसार अतिरिक्त टँकर उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने