Trust India : भारतावर विश्वास का ठेवावा ? या प्रश्नाला परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेले उत्तर झाले Viral

नॉर्वे : नॉर्डिक देशांसोबत नॉर्वे येथे झालेल्या शिखर परिषदेनंतर पंतप्रधान मोदी इटलीतील रोमच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. नॉर्वेत मोदींच्या उपस्थितीत भारताने अनेक सहकार्य करार केले. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींना नॉर्वेने सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले. यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान त्यांच्या नियोजीत कार्यक्रमानुसार पुढे रवाना झाले. याआधी पंतप्रधान मोदी आणि नॉर्वेचे पंतप्रधान यांच्या औपचारिक भाषणांचा कार्यक्रम संपल्यावर अखेरच्या टप्प्यात हेले लिंग या महिला पत्रकाराने मोदींना प्रश्न विचारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. तिथे जमले नाही पण हेले लिंग यांनी भारताच्या दूतावासाने नॉर्वेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताला प्रश्न विचारला. भारतावर विश्वास का ठेवावा ? असा प्रश्न त्यांनी विचारला. या प्रश्नाला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने उत्तर दिले. पण हे उत्तर ऐकण्याऐवजी हेले लिंग या पत्रकार परिषद सोडून निघून गेल्या. उत्तर देऊन झाल्यानंतर थोड्या वेळाने हेले लिंग परतल्या. या प्रकारामुळे हेले लिंग खरंच प्रश्न विचारण्यासाठी आलेल्या पत्रकार होत्या की पत्रकाराच्या रुपात भारताला बदनाम करण्यासाठी आलेल्या एजंट होत्या असा प्रश्न सोशल मीडियातून उपस्थित केला जात आहे. या निमित्ताने सोशल मीडियात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेले उत्तर व्हायरल होत आहे.



पत्रकार हेले लिंग यांना अनेकजण ट्रोल करत आहेत. अनेकांनी त्यांना विदेशी एजंट तर काही जणांनी त्यांना चिनी एजंट म्हटले आहे. हेले लिंग यांनी चीन आणि शी जिनपिंग यांच्याबाबत लिहिलेले लेख व्हायरल करुन त्यांना ट्रोल केले जात आहे. ट्रोलिंगचा सामना केल्यानंतर लिंग यांनी पुन्हा एक्स पोस्ट करत आपण गुप्तहेर नसल्याचे म्हटले आहे. मी पत्रकार असून प्रश्न विचारणे माझे कर्तव्य आहे, असे त्या म्हणाल्या. पण कार्यक्रम संपल्यानंतर मोदींना प्रश्न विचारण्यामागील कारण त्यांनी सांगितले नाही.





कोण आहेत हेले लिंग ?


नॉर्वेची राजधानी ओस्लो येथील एका दैनिकात काम करणाऱ्या हेले लिंग या पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्यापूर्वी फारशा प्रसिद्ध नव्हत्या. पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्यापूर्वी त्यांची शेवटची एक्स पोस्ट १० एप्रिल २०२४ ची होती. याआधी २०२२ मध्ये एक आणि २०२१ मध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी आणि जागतिक नेत्यांचा जी२० रोम शिखर परिषदेतला एक फोटो रीपोस्ट केला होता.



हेले लिंग सोशल मीडियावर जास्त सक्रिय नव्हत्या. त्यामुळेच त्यांना पंतप्रधान मोदींच्या समोर जाणूनबुजून प्रश्न विचारण्यासाठी पाठवल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या दोन दिवस आधी हेले लिंग यांचे एक्स हँडल व्हेरिफाईड झाले असल्याचीही सोशल मीडियात चर्चा आहे.





भारताने दिले उत्तर


भारतीय दूतावासाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताच्या परराष्ट्र खात्याचे सचिव सिबी जॉर्ज यांनी हेले लिंग यांच्या प्रश्नाला उत्तर दिले. हे उत्तर ऐकण्याऐवजी हेले लिंग या पत्रकार परिषद सोडून निघून गेल्या. उत्तर देऊन झाल्यानंतर थोड्या वेळाने हेले लिंग परतल्या. या प्रकारामुळे हेले लिंग खरंच प्रश्न विचारण्यासाठी आलेल्या पत्रकार होत्या की पत्रकाराच्या रुपात भारताला बदनाम करण्यासाठी आलेल्या एजंट होत्या असा प्रश्न सोशल मीडियातून उपस्थित केला जात आहे. या निमित्ताने सोशल मीडियात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेले उत्तर व्हायरल होत आहे.



कोण आहेत सिबी जॉर्ज ?


सिबी जॉर्ज हे १९९३ च्या भारतीय परराष्ट्र सेवेच्या बॅचचे अधिकारी आहेत. सध्या ते परराष्ट्र खात्याचे सचिव (पश्चिम) म्हणून काम करत आहेत. नॉर्वेमध्ये काम करण्यापूर्वी त्यांनी जपानमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात कैरोमध्ये भारतीय दूतावासात अधिकारी म्हणून झाली. त्यानंतर तीन दशकात त्यांनी स्वित्झर्लंड, होली सी, लिकटेंस्टाईन, कुवैत आणि मार्शल बेटे प्रजासत्ताक या ठिकाणी काम केले. मूळचे केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातले सिबी जॉर्ज हे पाला येथील पोडीमट्टम कुटुंबातून येतात. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणात त्यांनी सुवर्ण पदक जिंकले होते. कैरोमधील अमेरिकन विद्यापीठात त्यांनी उच्च शिक्षण घेतले होते. त्यांनी मसुरीमधील लबासना (LBSNAA), आयआयएम अहमदाबाद, आयआयएम बंगळुरू, आयएसबी हैदराबाद येथूनही शिक्षण घेतले आहे.


Comments
Add Comment

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Nashik Crime : एटीएसच्या नावाने ‘डिजिटल अरेस्ट’, नाशिकच्या मॅनेजरची ९० लाखांची फसवणूक

Nashik Crime : नाशिकमध्ये सायबर फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हेगारांनी स्वतःला एटीएस आणि मुंबई

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र