FIFA World Cup 2026: २०२६ फिफा वर्ल्ड कपसाठी पोर्तुगालचा संघ जाहीर; अखेरच्या स्वप्नासाठी रोनाल्डो सज्ज

Portugal : फिफा वर्ल्ड कप २०२६ साठी पोर्तुगाल राष्ट्रीय फुटबॉल संघटनाने अंतिम संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व अनुभवी स्टार क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) करणार आहे. ४१ वर्षांच्या रोनाल्डोचा आपल्या करियरचा हा शेवटच्या वर्ल्ड कप ठरु शकतो. पोर्तुगालला विजेतेपद मिळवून देण्याच्या निर्धाराने रोनाल्डो मैदानात उतरणार आहे. फुटबॉल इतिहासातील महान खेळाडूंपैकी एक मानला जाणारा रोनाल्डो याचा हा सहावा वर्ल्ड कप असणार आहे. २००६ च्या वर्ल्ड कपमध्ये पोर्तुगालने उपांत्य फेरी गाठली होती, मात्र त्यानंतर संघाला त्या पलीकडे जाता आले नाही. नॉकआऊट सामन्यात रोनाल्डोला आतापर्यंत केवळ एकच गोल मारता आला आहे, त्यामुळे या वेळी विजेतेपद जिंकण्याचे त्याचे स्वप्न अधिकच तीव्र झाले आहे.


प्रशिक्षक म्हणून मार्टिनेझ यांची भूमिका


२०२२ विश्वचषकानंतर पद सोडलेल्या Fernando Santos यांच्या जागी जानेवारी २०२३ मध्ये रॉबर्टो मार्टिनेझ यांनी पोर्तुगालच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. यापूर्वी त्यांनी Belgium national football team चेही नेतृत्व केले होते. मार्टिनेझ यांच्या मार्गदर्शनाखाली पोर्तुगालने UEFA Nations League २०२४-२५ चे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी Spain ला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत केले होते.





विश्वचषकातील पोर्तुगालचा इतिहास


पोर्तुगालच्या इतिहासातला हा ९ वा वर्ल्ड कप असणार आहे.१९६६ मध्ये इंग्लंड येथे झालेल्या वर्ल्ड कपमध्ये पोर्तुगालने तिसरे स्थान मिळवले होते. त्या स्पर्धेत महान फुटबॉलपटू Eusébio याने सर्वाधिक गोल केले होते. दरम्यान, काही विश्लेषकांच्या मते संघातील युवा खेळाडू जोआओ नेवेस (João Neves) आणि राफेल लिओ (Rafael Leão) यांच्याकडूनही २०२६ च्या वर्ल्ड कपमध्ये मोठ्या अपेक्षा आहेत. पोर्तुगालसाठी ही स्पर्धा भावनिकही ठरू शकते. संघाचा माजी फॉरवर्ड Diogo Jota यांच्या निधनानंतर एका वर्षाने संघ जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्पर्धेत विजेतेपदासाठी झुंज देणार आहे.



पोर्तुगाल फुटबॉल असोसिएशनने जाहीर केलेले संघ :


गोलकीपर: डिएगो कोस्टा, जोस सा, रुई सिल्वा, रिकार्डो वेल्हो.


डिफेंडर्स: डिएगो डालोट, मॅथियस नुनेस, नेल्सन सेमेडो, जोआओ कॅन्सेलो, नूनो मेंडेस, गोंसालो इनासियो, रेनाटो वेइगा, रुबेन डियास, टॉमस अराउजो.


मिडफिल्डर: रूबेन नेवेस, जोआओ नेवेस, विटिन्हा, ब्रुनो फर्नांडिस, बर्नार्डो सिल्वा, जोआओ फेलिक्स, फ्रान्सिस्को ट्रिनकाओ, फ्रान्सिस्को कॉन्सिसिओ, सामू कोस्टा.


फॉरवर्ड: पेड्रो नेटो, राफेल लिओ, गोंसालो गुएडेस, गोंसालो रामोस, क्रिस्टियानो रोनाल्डो.

Comments
Add Comment

Duleep Trophy Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं शतक अवघ्या ८ धावांनी हुकलं; सचिनचा 'तो' विक्रम मोडण्याची संधी गमावली

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) दमदार फलंदाजी करत सर्वांचे

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.