Israel Lebanon Air Strike : इस्रायलचा दक्षिण लेबनॉनवर हल्ला, किमान १५ जणांचा मृत्यू

- १२ गावे रिकामी करण्याचा इशारा


इस्रायलने दक्षिण लेबनानवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान १५ जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने दक्षिण लेबनॉनमधील १२ गावांना तात्काळ रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. १६ एप्रिल रोजी लेबनॉन आणि इस्रायल यांच्यात झालेल्या युद्धविरामानंतरही दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. काही माध्यम संस्थांनी अपुष्ट सूत्रांच्या हवाल्याने मृतांचा आकडा १९ असल्याचे म्हटले आहे. (Israel Lebanon Air Strike)



लेबनॉनमधील वृत्तपत्र ‘लोरिएंट टुडे’च्या अहवालानुसार, इस्रायलने मंगळवारी रक्तपात घडवत दक्षिण लेबनान आणि बेका खोऱ्यातील १२ गावे रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये दक्षिण भागातील महत्त्वाचे गाव नबातियेह ताहता याचाही समावेश आहे. अहवालानुसार, मंगळवारी इस्रायली हल्ल्यात कफर सिर येथे चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. मृतांची ओळख सफिया बद्र अल-दीन, अली नाजीह कामिहा, नाजीहा कामिहा आणि अहमद अल-सब्लिनी अशी झाली आहे.





देइर कानन अल-नहर येथे इस्रायलने टाउन हॉलजवळील एका घराला लक्ष्य केले. या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे. नगर परिषदेचे अध्यक्ष अली कुस्सैर यांनी सांगितले की, लक्ष्य करण्यात आलेले घर एका मोठ्या कुटुंबाचे होते. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आणखी तीन जणांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य अद्याप सुरू आहे. याशिवाय हारौफ (नबातियेह) येथे झालेल्या इस्रायली ड्रोन हल्ल्यात किमान एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हा हल्ला नगरपालिका मुख्यालयाजवळ झाला. यात गावाच्या नगर परिषद सदस्य नासिर नासर यांचा मृत्यू झाला. फ्रौन (बिंत जुबैल) येथे झालेल्या हल्ल्यातही एका व्यक्तीचा मृत्यू झाला. आणखी एका ड्रोन हल्ल्यात मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला.





नबातियेह मधील हल्ल्यात किमान एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच दुपारी दोन वाजता इस्रायली सैनिकांनी कफर हम्माम आणि कफर शुबा (हसबया) परिसराच्या बाहेरील भागातून सात जणांचे अपहरण केले. सिव्हिल डिफेन्सनुसार, त्यापैकी चार जण सीरियन मजूर होते. त्यांना नंतर सोडून देण्यात आले. सिव्हिल डिफेन्सने सांगितले की, तीन नागरिक अद्याप ताब्यात आहेत.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे