'Raja Shivaji' Movie : ‘राजा शिवाजी’चा तिसऱ्या आठवड्यातही दबदबा; ७५ कोटींचे बजेट वसूल, आता १०० कोटींकडे वाटचाल!

मुंबई : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तिसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाची घोडदौड कायम असून, प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादामुळे कमाईचे आकडे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि दमदार सादरीकरणामुळे हा चित्रपट आता मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.


दर आठवड्याला अनेक नवीन चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत असतात. मात्र, त्यातील फारच कमी चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ राज्य करू शकतात. सध्या हेच चित्र ‘राजा शिवाजी’च्या बाबतीत पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या पहिल्या दिवशी रिलीज झालेल्या या चित्रपटाने सुरुवातीपासूनच बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड निर्माण केली. विशेष म्हणजे, मराठीसोबत हिंदी भाषेतही प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.



चित्रपट रिलीजपूर्वीच ‘राजा शिवाजी’ची जोरदार चर्चा रंगली होती. रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारण्यासोबतच दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या होत्या आणि थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट त्या अपेक्षांवर पूर्णपणे खरा उतरल्याचे दिसून आले. दमदार कथा, भव्यदिव्य सेट्स, युद्धदृश्ये आणि अभिनयामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले आहे.


विशेष म्हणजे, ‘राजा शिवाजी’ने प्रदर्शनाच्या दुसऱ्याच आठवड्यात आपला संपूर्ण खर्च वसूल केला. त्यानंतरही चित्रपटाची कमाई सातत्याने सुरूच असून आता हा चित्रपट नफा कमावणाऱ्या यशस्वी चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. तिसऱ्या आठवड्यातदेखील चित्रपटाची कमाई कोटींच्या घरात कायम आहे, त्यामुळे चित्रपटाची लोकप्रियता अजूनही तसूभरही कमी झालेली नाही, हे स्पष्ट होत आहे.



दरम्यान, ‘राजा शिवाजी’च्या कमाईबद्दल बोलायचे झाल्यास, चित्रपटाने पहिल्या आठवड्यात तब्बल ५२.६५ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाने दमदार कामगिरी करत २४.३० कोटी रुपयांचा गल्ला जमवला.


त्यानंतर १५ व्या दिवशी चित्रपटाने १.४५ कोटी रुपये कमावले. १६ व्या दिवशी या कमाईत वाढ होत २.७० कोटी रुपये जमा झाले. १७ व्या दिवशी चित्रपटाने ३.४५ कोटी रुपयांची तगडी कमाई केली, तर १८ व्या दिवशीही चित्रपटाने १.१५ कोटी रुपये कमावले.


आता सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, १९ व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या मंगळवारी ‘राजा शिवाजी’ने आणखी १.३० कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामुळे या चित्रपटाची भारतातील एकूण निव्वळ कमाई आता ८७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.


मराठी आणि हिंदी या दोन्ही आवृत्त्यांमधून मिळून ‘राजा शिवाजी’ने भारतात आतापर्यंत ८७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाचे एकूण बजेट सुमारे ७५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चित्रपटाने आतापर्यंत जवळपास १३ कोटी रुपयांचा नफा कमावला असून, नफ्याचे प्रमाण १७.३३ टक्क्यांवर पोहोचले आहे. तथापि, सुपरहिटचा टॅग मिळवण्यासाठी या चित्रपटाला आपले बजेट दुप्पट करणे आवश्यक मानले जाते. त्या हिशोबाने ‘राजा शिवाजी’ला १५० कोटी रुपयांचा टप्पा गाठावा लागणार आहे. मात्र, सध्याचा वेग पाहता हा चित्रपट आगामी दिवसांत आणखी अनेक विक्रम आपल्या नावावर करेल, अशी चर्चा रंगली आहे.


विशेष म्हणजे, भारतीय बॉक्स ऑफिसच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही मराठी चित्रपटाने १०० कोटी रुपयांचा टप्पा पार केलेला नाही. त्यामुळे ‘राजा शिवाजी’समोर आता ऐतिहासिक संधी उभी आहे. हा बहुप्रतिक्षित टप्पा गाठण्यासाठी चित्रपटाला आणखी केवळ १३ कोटी रुपयांची गरज आहे. चौथ्या आठवड्यातही प्रेक्षकांचा असाच प्रतिसाद कायम राहिला, तर ‘राजा शिवाजी’ मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला १०० कोटी क्लबमध्ये पोहोचणारा चित्रपट ठरू शकतो.

Comments
Add Comment

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’

Drishyam : ‘दृश्यम 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा ! आता 'दृश्यम 4’ येणार ? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं...

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपट मालिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. रहस्य, थरार