Reserve Bank Of India (RBI) : यशवंत सहकारी बँक बंद; खातेदारांना पैसे कसे मिळणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

फलटण : महाराष्ट्रातील फलटण येथील ‘यशवंत सहकारी बँक’चा परवाना भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रद्द केला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल नसणे, आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत होणे आणि भविष्यात उत्पन्न वाढण्याची कोणतीही शक्यता नसल्यामुळे RBI ने ही मोठी कारवाई केली. १९ मे १०१६ रोजी व्यवसाय बंद झाल्यानंतर बँकेचे सर्व व्यवहार थांबवण्यात येणार आहेत.


RBI ने महाराष्ट्र सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांच्या निबंधकांना बँक बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले असून लिक्विडेटर नियुक्त करण्याची विनंतीही केली आहे. बँकेने बँकिंग नियमन कायद्यातील अनेक आवश्यक नियमांचे पालन केले नसल्याचे RBI च्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच बँकेची आर्थिक परिस्थिती पाहता सर्व ठेवीदारांचे पैसे परत करण्याची क्षमता उरलेली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बँक सुरू ठेवणे हे ठेवीदारांच्या हिताविरोधात ठरू शकते, असे RBI ने म्हटले.



दरम्यान, या निर्णयामुळे खातेदारांमध्ये चिंता निर्माण झाली असली तरी बहुतांश ठेवीदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार सुमारे ९९.०२ टक्के ठेवीदारांच्या ठेवी ५ लाख रुपयांच्या आत आहेत. त्यामुळे या खातेदारांना त्यांच्या ठेवींची पूर्ण रक्कम परत मिळू शकते.


बँक लिक्विडेशन प्रक्रियेत गेल्यानंतर डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) मार्फत प्रत्येक ठेवीदाराला ५ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळते. बचत खाते, चालू खाते, मुदत ठेव (FD) आणि आवर्ती ठेव (RD) अशा सर्व खात्यांतील एकूण रक्कम एकत्रित धरून हे विमा संरक्षण लागू होते. म्हणजेच एका व्यक्तीच्या एका बँकेतील सर्व खात्यांचा एकत्र विचार केला जातो. प्रत्येक खात्यासाठी स्वतंत्र ५ लाखांचे संरक्षण मिळत नाही.



DICGC ने २० एप्रिल २०२६ पर्यंत बँकेच्या ठेवीदारांना तब्बल १०६.९६ कोटी रुपयांची रक्कम आधीच वितरित केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बहुतांश खातेदारांना त्यांचे पैसे मिळण्याची प्रक्रिया सकारात्मक दिशेने सुरू असल्याचे मानले जात आहे.


मात्र ज्यांच्या ठेवी ५ लाख रुपयांपेक्षा अधिक आहेत, त्यांना उर्वरित रक्कम बँकेच्या मालमत्तेची विक्री आणि लिक्विडेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळू शकते. परंतु ही प्रक्रिया किती काळ चालेल आणि किती रक्कम परत मिळेल याबाबत निश्चितता नसते.


DICGC ही RBI ची उपकंपनी असून भारतातील सर्व व्यावसायिक बँका, सहकारी बँका आणि ग्रामीण बँकांमधील ठेवींना विमा संरक्षण देते. १ फेब्रुवारी २०२० पासून ठेवींवरील विमा मर्यादा १ लाखांवरून वाढवून ५ लाख रुपये करण्यात आली होती.


दरम्यान, खातेदारांनी सध्या काही महत्त्वाच्या गोष्टी काळजीपूर्वक सांभाळून ठेवणे आवश्यक आहे. बँकेचे पासबुक, FD प्रमाणपत्रे, खाते कागदपत्रे आणि व्यवहारांची माहिती सुरक्षित ठेवावी. लिक्विडेटर नियुक्त झाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधावा. तसेच DICGC आणि RBI च्या अधिकृत वेबसाइटवरून सातत्याने अद्ययावत माहिती तपासत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


फलटणच्या यशवंत सहकारी बँकेतील बहुतांश खातेदारांच्या ठेवी ५ लाखांच्या मर्यादेत असल्याने त्यांना संपूर्ण रक्कम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र मोठ्या ठेवी असलेल्या खातेदारांना त्यांच्या पैशांसाठी लिक्विडेशन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.

Comments
Add Comment

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर