मुंबई : मुंबईतील वांद्रे परिसरातील गरिब नगर येथे झालेल्या दगडफेक प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत १६ जणांना अटक केली आहे. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. (Bandra Encroachment Removal Campaign)
सध्या गरिब नगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. (Bandra Encroachment Removal Campaign)