Graduate Girl Kissed Crocodile Viral Post : थरारक! पदवी मिळाल्याच्या आनंदात तरुणीने केले १४ फुटी मगरीला 'KISS'; फोटोशूट जगभरात व्हायरल

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पदवी मिळवण्याचा दिवस प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि खास असतो. या दिवशी बहुतांश तरुण-तरुणी आपल्या कुटुंबासोबत, आई-वडिलांसोबत किंवा मित्रपरिवारासोबत सुंदर फोटोशूट करून हा क्षण कायमचा कॅमेऱ्यात कैद करतात. मात्र, अमेरिकेतील (America)  एका धाडसी तरुणीने आपला ग्रॅज्युएशन डे (Graduation Day)  अशा काही भयानक आणि थरारक पद्धतीने साजरा केला आहे, ज्याची सध्या संपूर्ण जगभरात जोरदार चर्चा सुरू आहे. या तरुणीने चक्क एका १४ फूट लांबीच्या महाकाय मगरीसोबत फोटोशूट करत पाहणाऱ्या सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकवली आहे.



उघड्या जबड्यावर दिले चुंबन




मॅकनीस स्टेट युनिव्हर्सिटीमधून (McNeese State University) नुकतीच पदवी प्राप्त केलेल्या कॅट डेली (Kat Daly) या तरुणीने हा अजब आणि अंगावर शहारे आणणारा पराक्रम केला आहे. पदवी मिळाल्याचा आनंद काहीतरी हटके पद्धतीने साजरा करण्याच्या उद्देशाने कॅटने एक भन्नाट शक्कल लढवली. अंगावर नेव्ही ब्लू रंगाचा ग्रॅज्युएशन गाऊन आणि डोक्यावर ग्रॅज्युएशन कॅप परिधान केलेल्या अवस्थेत ती थेट पाण्यात उतरली. धक्कादायक बाब म्हणजे, तिथे असलेल्या तब्बल १४ फुटी मगरीच्या ती नुसती जवळच गेली नाही, तर तिने त्या मगरीच्या उघड्या जबड्यावर चक्क चुंबन (Kiss) घेतले. तिचा हा काळजाचा ठोका चुकवणारा स्टंट सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे.



कोण आहे कॅट डेली ?


वरवर पाहता हा एखाद्याचा निव्वळ वेडेपणा किंवा प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट वाटत असला तरी, यामागे एक मोठे सत्य दडलेले आहे. कॅट ही मगरींसोबत वावरणारी कोणतीही नवशिख्या किंवा सामान्य तरुणी नाही. ती आपल्या होणाऱ्या पतीसोबत मिळून 'गेटर कंट्री' (Gator Country) नावाचे एक रेस्क्यू पार्क (Rescue Park) चालवते. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून ती अशा खतरनाक आणि जंगली प्राण्यांच्या सानिध्यात वाढली आहे. विशेष म्हणजे, या फोटोशूटदरम्यान कॅटच्या हातात एक अत्यंत विषारी सापही होता, ज्याला ती एखाद्या बाहुलीसारखे लीलया हाताळत होती. तिला पाहून फोटोग्राफरलाही मगरीपेक्षा त्या विषारी सापाचीच जास्त धास्ती वाटत होती!



समाजाला दिलेला संदेश आणि कडक इशारा


या अत्यंत जीवघेण्या फोटोशूटमागे कॅटचा एक खास आणि महत्त्वाचा हेतू दडलेला होता. मगरींबद्दल लोकांच्या मनात असलेली अनाठायी भीती आणि गैरसमज दूर करण्याचा तिचा प्रयत्न होता. 'मगरी नेहमीच आक्रमक नसतात आणि विनाकारण माणसांवर हल्ला करत नाहीत,' हे तिला या फोटोंच्या माध्यमातून जगाला दाखवून द्यायचे होते. तिचे हे फोटो आज जगभरात आश्चर्याचा विषय ठरत असले तरी, सामान्य लोकांसाठी यातून एक कडक इशाराही देण्यात आला आहे. कॅट ही एक अत्यंत अनुभवी आणि प्रशिक्षित प्राणीमित्र असल्याने तिला मगरींना कसे हाताळावे हे अचूक माहिती आहे. मात्र, सामान्य नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घराच्या आसपास किंवा जंगलात अशा प्रकारचा स्टंट करण्याचा किंवा जंगली प्राण्यांच्या जवळ जाण्याचा अजिबात प्रयत्न करू नये, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

WhatsApp : परदेशात गेल्यावर सिम कार्डची कटकट कायमची बंद होणार? व्हॉट्सॲप आणतंय 'हे' धमाकेदार फीचर!

परदेश प्रवास करणार्‍यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या

Germany Strange Rules: बागेत बाकावर बसून रडणाऱ्या महिलेला दंड! जर्मनीतील अजब नियम चर्चेत

Germany Strange Rules: कधीकधी, आपण एकटे असतो, अस्वस्थ वाटत असते, तेव्हा कोणाशीतरी बोलण्याऐवजी थोडा वेळ एकटे बसावेसे वाटते.

16 डिसेंबरपूर्वी बांगलादेशात महाभूकंप! हसीनांच्या निकटवर्तीयांना अटक; 108 तुकड्या तैनात झाल्याने खळबळ

ढाका : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बांगलादेशात परतण्याच्या नियोजित दौऱ्याला काहीच काळ शिल्लक असताना, तारिक

इंडोनेशियात बेकायदा सोन्याच्या खाणीत पाणी शिरलं; 13 कामगारांचा मृत्यू, 13 बेपत्ता

इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात एका अनधिकृत सोन्याच्या खाणीत पाणी शिरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या

पोलिश तरुणी वंदे भारत पाहून थक्क! चहा-पोह्याचा आस्वाद घेत रचला व्हायरल व्हिडिओ; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचा आणि बदलत्या स्वरूपाचा अनुभव आता परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. पोलंडमधील एका

Senator speech holding 6 month baby parliament : ६ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सिनेटरचे संसदेत भाषण; लिडिया थॉर्पसोबत चिमुकलीचा लपाछपीचा खेळ, भावूक व्हिडिओ व्हायरल

मुंबई : राजकीय सभागृहाचे कामकाज म्हटले की तणावपूर्ण चर्चा, खडाजंगी आणि कडक शिस्त असेच चित्र नेहमी पाहायला मिळते.