ICC : क्रिकेट विश्वात खळबळ! क्रिकेट कॅनडाच्या अध्यक्षांच्या घरावर गोळीबार; नेमकं प्रकरण काय?

क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. क्रिकेट कॅनडाचे नवे अध्यक्ष अरविंदर खोसा यांच्या घरावर बुधवारी पहाटे गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पहाटे ४.४० वाजता फायरिंग

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे सुमारे ४.४० वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार झाला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. अरविंदर खोसा यांची ९ एप्रिल रोजी क्रिकेट कॅनडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भ्रष्टाचार आणि मॅच फिक्सिंग आरोपांमुळे चर्चेत


क्रिकेट कॅनडा आधीपासूनच वादात सापडले आहे. काही आठवड्यांपूर्वी झालेल्या एका चौकशीत भ्रष्टाचार, संघटित गुन्हेगारी आणि मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप समोर आले. या प्रकरणात अरविंदर खोसा यांचे नावही चर्चेत आले होते. रिपोर्टनुसार, त्यांचा संबंध स्वतःला लॉरेंस बिश्नोई गँगशी जोडणाऱ्या काही स्थानिक खेळाडूंशी असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच २०२५ मध्ये कॅनडाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघातील एका खेळाडूला धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला होता. मात्र खोसा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

पोलिसांकडून तपास सुरू

घरावर झालेल्या गोळीबारानंतर या संपूर्ण प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून हल्ल्यामागचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा क्रिकेट कॅनडाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून