UPSC च्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (यूपीएससी) वर्ष २०२७ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा आणि भरती चाचण्यांचे अधिकृत वार्षिक वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार आगामी वर्षात नागरी सेवा, इंजिनिअरिंग सेवा, वैद्यकीय सेवा आणि संरक्षण दलातील विविध महत्त्वाच्या परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. परिस्थितीनुसार या परीक्षांच्या तारखा आणि कालावधीमध्ये बदल केला जाऊ शकतो, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.



देशभरातील लाखो उमेदवार विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. यूपीएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकामुळे उमेदवारांना अभ्यासाचे नियोजन करणे, परीक्षेची तयारी करण्याचे अधिक नेमके नियोजन करण्यास मदत होते. परीक्षेची अधिसूचना जाहीर झाल्यापासून अर्ज करण्यासाठी साधारणपणे तीन ते चार आठवड्यांचा वेळ मिळतो. उमेदवारांनी अधिकृत आणि सविस्तर माहितीसाठी, कोणत्याही संभाव्य बदलांची माहिती घेण्यासाठी ‘यूपीएससी’च्या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.



महत्त्वाच्या परीक्षा आणि वेळापत्रक


१) नागरी सेवा आणि वन सेवा परीक्षा: देशातील अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी ‘नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२७’ आणि ‘भारतीय वनसेवा पूर्व परीक्षा २०२७’ ही संयुक्तपणे २३ मे २०२७ रोजी होणार. या परीक्षेची अधिसूचना १३ जानेवारी २०२७ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत २ फेब्रुवारी २०२७ असेल. तर ‘नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२७’ ही २० ऑगस्ट २०२७ पासून सुरू होणार आहे. तसेच ‘भारतीय वनसेवा मुख्य परीक्षा २०२७’ २१ नोव्हेंबर २०२७ पासून आयोजित केली जाणार आहे.


२) अभियांत्रिकी आणि भू-वैज्ञानिक परीक्षा: ‘संयुक्त भूवैज्ञानिर पूर्व परीक्षा’ १० जानेवारी २०२७ रोजी, तर ‘अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा’ ३१ जानेवारी २०२७ रोजी घेण्यात येईल. या दोन्ही परीक्षांची मुख्य परीक्षा अनुक्रमे १९ जून २०२७ आणि १८ जून २०२७ रोजी सुरू होणार आहेत.


३) संरक्षण आणि सुरक्षा दलांच्या परीक्षा: एनडीए आणि एनए परीक्षा (I) व सीडीएस परीक्षा (I): या दोन्ही परीक्षा ११ एप्रिल २०२७ (रविवार) रोजी आयोजित केल्या जातील. एनडीए आणि एनए परीक्षा (II) व सीडीएस परीक्षा (II): या परीक्षा १९ सप्टेंबर २०२७ रोजी होतील. सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस परीक्षा २०२७: ही परीक्षा ४ जुलै २०२७ रोजी घेतली जाईल, ज्यासाठी १७ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२७ या कालावधीत अर्ज करता येतील.


४) वैद्यकीय आणि सांख्यिकी सेवा परीक्षा: ‘संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०२७’ ही परीक्षा १८ जुलै २०२७ रोजी, तसेच ‘आयईएस/आयएसएस परीक्षा २०२७’ ही १८ जून २०२७ पासून सलग तीन दिवस चालणार आहे.


५) विभागीय परीक्षा आणि राखीव तारखा: आयोगाने विभागीय परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. त्यात सीबीआय डीएसपी परीक्षा २७ फेब्रुवारी २०२७ रोजी, सीआयएसएफ ‘परीक्षा १४ मार्च २०२७ रोजी आणि स्टेनो परीक्षा १८ डिसेंबर २०२७ रोजी घेतली जाईल. वर्षभरात इतर विविध भरती चाचण्यांसाठी जानेवारी, मार्च, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर महिन्यांत ठराविक शनिवार, रविवारच्या तारखा राखीव ठेवण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न