CBI : शुभम खैरनारची पुण्यात सीबीआयकडून सखोल चौकशी

पुणे : 'नीट' पेपरफुटी प्रकरणात नाशिक येथून अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी शुभम खैरनार याला सीबीआयने पुण्यात आणले आहे. गुरुवारी त्याला पुण्यातील फुलेनगर येथील सीबीआय कार्यालयात ठेवून त्याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. खैरनारला अटक केल्यानंतर सुरुवातीला तपासासाठी दिल्लीला नेण्यात आले होते. दरम्यान, खैरनारचे पुण्यातील कोणत्या लोकांशी संपर्क होते, याची संपूर्ण यादी सीबीआयने तयार केली असून त्या दिशेने तपास सुरू आहे. याच प्रकरणातील इतर दोन महिला आरोपी प्राध्यापिका मनीषा मांढरे आणि ब्युटी पार्लर चालक मनीषा वाघमारे या सध्या सीबीआय कोठडीत आहेत. या दोन्ही आरोपींना शुभम खैरनारच्या समोरासमोर बसवून सीबीआयचे अधिकारी त्यांची एकत्रित चौकशी करत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे या कात्रज परिसरातील एकाच सोसायटीत राहतात. त्यांनी परीक्षेपूर्वी कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे 'विशेष वर्ग' (स्पेशल क्लास) घेतले होते, याची माहिती सीबीआयचे पथक गोळा करत आहे. याशिवाय, गैरव्यवहाराचे पुरावे गोळा करण्यासाठी या दोन्ही महिला आरोपींच्या हस्ताक्षरांचे (Handwriting) नमुने घेण्यात आले असून, ते तपासणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.


दिल्ली सीबीआयचे पथक पुण्यात;


नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता मोठी गती आली असून, दिल्ली सीबीआयचे विशेष पथकही पुण्यात दाखल झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सीबीआय महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये संशयित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची कसून चौकशी करत आहे. पुणे, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नागपूर या ठिकाणच्या काही विद्यार्थ्यांनी पेपर खरेदी केल्याचा दाट संशय तपास यंत्रणेला आहे. याच संशयावरून गुरुवारी सीबीआयने पुणे आणि परिसरातील काही विद्यार्थी व त्यांच्या पालकांना कार्यालयात बोलावून त्यांची चौकशी केली. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध आता घेतला जात आहे.

Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने