Vinesh Phogat : नियमांमध्ये झालेला अचानक बदल बरेच काही सांगून जातो, विनेश फोगाट प्रकरणी दिल्ली हायकोर्टानं कुस्ती महासंघाला सुनावलं

Delhi High Court : दिल्ली उच्च न्यायालयाने आई झाल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या भारतीय स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा दिलासा दिला आहे. सोबतच भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहे. भारतीय कुस्ती महासंघाने विनेशला 26 जून 2026 पर्यंत देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळण्यास 'अपात्र' घोषित केले होते. न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाला फटकारत स्पष्टपणे म्हटले की, "आई होणे हा गुन्हा नाही" आणि कोणत्याच खेळाडूला "सूडाच्या भावनेने" वागवले जाऊ शकत नाही.


मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला विनेश फोगाटच्या तंदुरुस्तीचे आणि स्पर्धेत परत येण्याचे मूल्यांकन करण्यासाठी तज्ज्ञांची समिती तातडीने स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. सोबतच न्यायालयाने असेही म्हटले आहे की, विनेशला आगामी आशियाई खेळांच्या निवड चाचण्यांमध्ये कोणत्याही परिस्थितीत सहभागी होण्याची संधी दिली पाहिजे.न्यायालयाने कठोरपणे सांगितले, खेळ हा कोणत्याही वैयक्तिक शत्रुत्वापेक्षा मोठा आहे. खेळाडूंच्या भविष्याशी अशी वागणूक देणे हे खेळाच्या हिताचे नाही.


आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना पूर्वीही दिलासा देण्यात आला आहे, परंतु विनेशच्या बाबतीत नियमांमध्ये झालेला हा अचानक बदल "बरेच काही सांगून जातो. या देशात मातृत्वाचा आदर केला जातो... त्याचा वापर खेळाडूच्या कारकिर्दीविरुद्ध शस्त्र म्हणून केला जाऊ शकत नाही. असेही सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने WFI च्या भूमिकेवर तीव्र टीका करत म्हटले आहे.



नेमकं प्रकरण काय ?


डब्ल्यूएफआयने विनेशला 26 जून 2026 पर्यंत देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळण्यास 'अपात्र' घोषित केले होते. संघटनेने दावा केला की, निवृत्तीनंतर पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंना उत्तेजक-विरोधी नियमांनुसार सहा महिन्यांची पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. तथापि, जुलै 2025 मध्ये आई झाल्यानंतर पुनरागमनाची तयारी करत असलेल्या विनेशने, असे असूनही गोंडा येथील राष्ट्रीय खुल्या मानांकन स्पर्धेत भाग घेतला. विनेशने न्यायालयात असा युक्तिवाद केला की, 9 मे रोजी बजावण्यात आलेली कारणे दाखवा नोटीस हा केवळ तिला वगळण्याचा एक प्रयत्न होता. 100 ग्रॅम जास्त वजन असल्यामुळे 2024 च्या उन्हाळी ऑलिम्पिकमधून तिची अपात्रता ही 'राष्ट्रीय लाजिरवाणी गोष्ट' असल्याचे संबोधणाऱ्या या नोटीसवर न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली.


2023 मध्ये महिला कुस्तीपटूंच्या ज्या ऐतिहासिक चळवळीत माजी अध्यक्ष बृज भूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप लावण्यात आले होते, त्या चळवळीचा चेहरा विनेश फोगाट देखील होती. विनेश स्वत: पीडित असल्याचे म्हटलं आहे.

Comments
Add Comment

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला