Donald Trump : ...तर मला ठार केले जाईल, मुलाच्या लग्नात जाण्यासही डोनाल्ड ट्रम्प घाबरले; कारण काय ?

Donald Trump is scared ? : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून सुरू आहे. या युद्धांचा परिणाम आता संपूर्ण जगावर होण्यास सुरुवात झाली आहे. कुठे महागाईचा भडका उडाला आहे तर कुठे लॉकडाऊन सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक देशांवर इंधन टंचाईचे मोठे परिणाम दिसत आहे. अशातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले एक विधान चर्चेत आले आहे. (America and Iran War)


डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाचे लग्न आहे. या गोडप्रसंगी डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र स्वतःच्या जीवाची भीती व्यक्त केली आहे. मुलाच्या लग्नाला त्यांना उपस्थित राहायचे आहे. पण जर लग्नाला गेले तर ते मारले जातील, याचीही भीती त्यांच्या मनात आहे. मुलाच्या लग्नाला जायचे आहे पण सध्याचा काळ आव्हानात्मक असल्याने आपण तिथे जाऊ शकत नसल्याचे त्यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी मजाकमध्ये म्हटले की, मी गेलो तर मला मारले जाईल आणि नाही गेलो तरीही मला मारले जाईल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानानंतर मुद्दा हा उपस्थित होतो की, इराणच्या भीतीने ते आपल्याच देशात फिरणे टाळत आहेत का? त्यांना इराणकडून मारले जाण्याची भीती त्यांना वाटतेय का?



सध्याची परिस्थिती सोपी नाही, तिथे जाण्याचा प्रयत्न करेल : ट्रम्प


डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाचे या आठवड्यातच लग्न आहे. बहामासमध्ये बेटिना अँडरसनशी त्यांच्या मुलाचा विवाह होणार आहे. हा एक छोटा खासगी समारंभ आहे. डोनाल्ड ट्रम्प यादरम्यान बोलताना म्हणाले की, माझ्या मुलाची इच्छा आहे की, मी त्याच्या लग्नात उपस्थित राहावे. पण सध्याची परिस्थिती सोपी नाही. हा एक छोटासा समारंभ आहे. मी तिथे जाण्याचा प्रयत्न करेल. (America and Iran War)


पुढे डोनाल्ड ट्रम्प यांनी हसत हसत म्हटले की, मी त्याला म्हणालो की, माझ्याकरिता ही योग्य वेळ नाही. मी सध्या एका गोष्टीच अडकलो आहे, इराणमध्ये. इराणसोबतच आणखीन काही गोष्टीमध्ये गुंतलो आहे. यामध्ये माझा कोणताही विजय होणार नसल्याचेही सांगताना यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प दिसले. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे म्हणणे आहे की, लग्नाला गेलो तरीही माझ्यावर प्रचंड टीका होईल.



इराण आणि अमेरिका युद्धात जग संकटात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अगोदर इस्त्रायलसोबत मिळून इराणवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यानंतर त्यांनी हे युद्ध फार काळ चालणार नसल्याचे थेट संकेत दिले. मात्र, आता दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ होऊनही युद्ध काही थांबत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांना लवकरात लवकर हे युद्ध संपवायचे आहे. मोठे नुकसान अमेरिकेचे होत आहे. शिवाय कच्च्या तेलाच्या किमतीही गगणाला पोहोचल्या आहेत. पुरवठा साखळीच विस्कळीत झाली. युद्धविरामाबाबत अमेरिका आणि इराणमध्ये वाटाघाटी सुरू आहे. सतत बैठका आहेत. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान चर्चेत आले आहे.

Comments
Add Comment

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

Nepal Floods : नेपाळच्या महापुरात बँक बुडाली, पण आत सापडला कोट्यवधींचा खजिना; ५० कोटींचे सोने, रोकड आणि चांदी सुरक्षित बाहेर

काठमांडू : नेपाळमध्ये भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. पूर आणि

PM Modi SCO Summit : बिश्केकमध्ये पंतप्रधान मोदींची पुतीन, पेझेश्कियन यांच्याशी भेट; वर्ल्ड नोमॅड गेम्सच्या उद्घाटन सोहळ्यालाही उपस्थिती

बिश्केक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या किर्गिस्तानच्या दौऱ्यावर असून, बिश्केक येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन

US Iran Conflict : अमेरिकेच्या हल्ल्याला इराणचा पलटवार; जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला, होर्मुजमध्ये तणाव वाढला

तेहरान : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे. अमेरिकेने इराणच्या लारक बेटावरील दोन रॉकेट

North Cyprus Ferry Accident : मोठी बातमी! २७० प्रवाशांना घेऊन जाणारी फेरी बोट उलटली; १०० हून अधिक जणांची सुटका, बचावकार्य सुरू

उत्तर सायप्रस : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. २७० प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी

Switzerland Rave Shooting : स्वित्झर्लंडमध्ये रेव्ह पार्टीत अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू, पाच गंभीर जखमी

बर्न : स्वित्झर्लंडमधील आराऊ शहरात रविवारी पहाटे रेव्ह पार्टीदरम्यान झालेल्या अंदाधुंद गोळीबारात एका