या पाच चुका नडल्या
- राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्य केले की, इराणबाबतच्या निर्णयाशी लोकं सहमत होते. पण त्यांना वाढलेल्या पेट्रोलच्या किमतीबाबत त्रास होता. इराणसोबतच्या युद्धामुळे इंधनाच्या किमती वाढल्या आहेत, हे त्यांनी मान्य केलं. याचा अमेरिकन नागरिकांच्या खिशावर परिणाम झाला.
- नाव मतपत्रिकेवर नसल्याचा फटका बसला, असा दुसरा युक्तिवाद डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. जर स्वतः निवडणुकीत उभे राहिले असते, तर पक्षाने प्रचंड विजय मिळवला असता, असा दावा त्यांनी केला.
- ट्रम्प यांनी पराभवासाठी आपल्या पक्षाच्या उमेदवारांनाही जबाबदार धरले. त्यांच्या मते, अनेक उमेदवारांना मतदारांचा पाठिंबा नव्हता, तसेच काहींना पक्षाच्या समर्थकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही.
- रिपब्लिकन पक्षाच्या पराभवासाठी ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला जबाबदार धरलं. ट्रम्प म्हणाले की, फॉक्स न्यूजने आपल्या चॅनलवर सातत्याने डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षांना स्थान दिले.
- मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅट्सनी आक्रमकपणे प्रचार केला आणि निवडणूक लढवली. त्याचा त्यांना फायदा झाल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं.
US Midterm Election : अमेरिकेतील मिडटर्म निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष पिछाडीवर पडल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी स्वतः ...
माझ्याकडे वीटो अधिकार....! ट्रम्प यांनी टाकले फासे
डेमोक्रॅट्सने मध्यवधी निवडणुकीत राजकीय समीकरण बदललं असलं तरी ट्रम्प मागे हटण्यास तयार नाहीत. गरज पडल्यास आपण आपल्या वीटो अधिकाराचा वापर करू, असे त्यांनी म्हटले आहे. "माझ्याकडे अंतिम अधिकार आहे, त्याला वीटो म्हणतात," असे ट्रम्प यांनी सांगितलं. अमेरिकन राजकारणात, राष्ट्रपतींचा नकाराधिकार हा काँग्रेसच्या निर्णयांवर नियंत्रण ठेवण्याचे एक महत्त्वाची घटनात्मक ताकद मानली जाते. जर काँग्रेसने एखादे विधेयक मंजूर केले, तर राष्ट्रपती त्याला नकाराधिकार वापरू शकतात.