CSK vs GT : गुजरातचा ८९ धावांनी दणदणीत विजय; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये गुजरात टायटन्सने दमदार विजय मिळवत चेन्नई सुपर किंग्जला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला आहे. गुजरातने चेन्नईवर तब्बल ८९ धावांनी विजय मिळवत प्लेऑफच्या शर्यतीचं समीकरण अधिक रंगतदार केलं आहे. आता प्लेऑफमध्ये जाणाऱ्या चौथ्या संघाचा निर्णय ‘सुपर संडे’ला होणार आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना २२९ धावा केल्या. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली आणि संपूर्ण संघ १४० धावांवर ऑलआऊट झाला. त्यामुळे गुजरातने ८९ धावांनी मोठा विजय मिळवला. २२९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात अत्यंत खराब झाली.



संजू सॅमसन खाते न उघडताच बाद झाला. त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड मैदानात आला, मात्र तोही फक्त १६ धावा करून माघारी परतला. उर्विल पटेलही शुन्यावर बाद झाला. यानंतर मॅथ्यू शॉर्टने काही आकर्षक फटके खेळत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण तो २४ धावांवर बाद झाला. त्यानंतर कार्तिक शर्मा आणि डेवाल्ड ब्रेविसकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा होती. मात्र कार्तिक शर्मा १९ धावांवर धावबाद झाला.


शिवम दुबेने काही काळ संघर्ष करत ४७ धावांची खेळी केली. पण त्याच्या बाद झाल्यानंतर चेन्नईची फलंदाजी पूर्णपणे ढासळली. एकामागोमाग एक विकेट पडत गेल्या आणि अखेर सीएसकेचा डाव १४० धावांवर संपुष्टात आला. या विजयासह गुजरात टायटन्सने १४ सामन्यांत १८ गुणांची कमाई केली. दुसरीकडे, या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलमधून बाहेर होणारी तिसरी टीम ठरली आहे. सीएसके स्पर्धेबाहेर गेल्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या चार संघांमध्ये प्लेऑफच्या चौथ्या स्थानासाठी चुरशीची लढत रंगणार आहे. पंजाब आणि केकेआर या दोन्ही संघांचे १३ सामन्यांत १३ गुण आहेत. जर या दोन्ही संघांनी आपापले शेवटचे सामने जिंकले, तर ते १५ गुणांसह प्लेऑफच्या शर्यतीत मजबूत दावेदार ठरतील.



दिल्ली कॅपिटल्सच्या १३ सामन्यांत १२ गुण आहेत. दिल्लीने पुढचा सामना जिंकला तरी त्यांचे १४ गुण होतील. मात्र राजस्थान रॉयल्सचे आधीच १४ गुण असल्यामुळे दिल्लीसाठी समीकरण कठीण बनलं आहे. आता सर्वांचं लक्ष ‘सुपर संडे’कडे लागलं आहे. कारण राजस्थान रॉयल्सचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. जर राजस्थानने हा सामना जिंकला, तर १६ गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ ठरेल. मात्र राजस्थानला पराभव स्वीकारावा लागला, तर पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्ससाठी प्लेऑफचे दरवाजे खुले होऊ शकतात. त्यामुळे आयपीएलच्या प्लेऑफची लढत आता अखेरच्या टप्प्यात अत्यंत रोमांचक बनली आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून