दुबईत झाडाला पिकलाय आंबा गाण्याची क्रेझ, मराठमोळा संगीतकार सागर पाटिलचं मराठी गाणं ट्रेंडिगला

मराठमोळा संगीतकार सागर पाटिल याने रचला इतिहास, दुबईत प्रदर्शित केले “मॅंगो अॅंथम” हे मराठी गीत


 दुबई:दुबईस्थित मराठमोळा संगीतकार आणि सांस्कृतिक उद्योजक सागर पाटील (BeatXX) यांनी त्यांचे नवीन गाणे “झाडाला पिकलाय आंबा – द मॅंगो अँथम” नुकतेच दुबईत प्रदर्शित केले आहे. भारतीय संस्कृती,  आणि संगीताचा उत्साहपूर्ण संगम असलेले हे गाणे सोशल मीडियावर प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. ‘द मॅंगो अँथम’ हे केवळ एक मनोरंजनात्मक गाणे नसून भारतीय संस्कृतीशी असलेली भावनिक नाळ आहे. विशेषतः मराठी संस्कृतीचा अभिमान आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या ओळखीचे प्रतीक म्हणूनही पाहिले जात आहे. आकर्षक संगीत, लक्षवेधी व्हिज्युअल्स आणि सहज गुणगुणता येईल अशी रचना यामुळे हे गाणे तरुणांमध्ये लोकप्रिय होत आहे.


संस्कृती जपणारा कलाकार सागर पाटील हे केवळ संगीत क्षेत्रापुरते मर्यादित नसून UAE मधील मराठी आणि भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी सातत्याने कार्यरत आहेत. ते प्रथा.UAE या सांस्कृतिक उपक्रमाचे संस्थापक असून या माध्यमातून त्यांनी विविध पारंपरिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यशाळांचे यशस्वी आयोजन केले आहे. गणेशोत्सव, शिवजयंती, दहीहंडी, दुर्ग मोहिम यांसारख्या उपक्रमांद्वारे UAE मधील नव्या पिढीला भारतीय संस्कृती प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या या कार्यामुळे अनेक मराठी आणि भारतीय कुटुंबांमध्ये सांस्कृतिक जडणघडण अधिक दृढ झाली आहे. मध्यपूर्वेत ढोल-ताशाचा जागतिक ठसा सागर पाटील यांनी मध्यपूर्वेत पारंपरिक ढोल-ताशा संस्कृतीच्या प्रसारातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. दुबईतील विविध मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय मंचांवर त्यांनी महाराष्ट्रीयन तालवाद्यांची ओळख प्रभावीपणे सादर केली आहे.


संगीतकार सागर पाटील (BeatXX) त्यांच्या संगीत प्रवासाविषयी सांगतात, “‘BeatXX’ या कलाकार नावाखाली मी स्वतःची स्वतंत्र आणि वेगळी संगीतशैली निर्माण केली आहे. मी संपूर्ण आखाती देश म्हणजेच मिडल ईस्ट देशात पहिल मराठी ढोल ताशा पथक सुरू केलं. त्यासाठी मला नुकताच महाराष्ट्र शासनाकडून “मराठी भाषा सन्मान” पुरस्कार मिळाला आहे. भावना, कथा आणि सांस्कृतिक संदर्भ यांचा आधुनिक संगीताशी केलेला संगम यामुळे संगीताची खास ओळख ठरली आहे. दुबईस्थित माझ्या होम स्टुडिओमधून मी विविध क्षेत्रांसाठी संगीत निर्मिती केली आहे, ज्यामध्ये लघुपटांसाठी बॅकग्राऊंड स्कोअर प्रादेशिक व अरबी चित्रपटांसाठी संगीत जाहिरातींसाठी जिंगल्स व ब्रँडेड ऑडिओ कंटेंट यांचा समावेश आहे. माझ नव गाण “झाडाला पिकलाय आंबा – द मॅंगो अँथम” नुकतच प्रदर्शित झाल आहे. या गाण्याला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मी संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय आणि मराठी संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रचार-प्रसार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच रसिक प्रेक्षकांसाठी नवनवीन गाणी घेऊन येईन.”


Link -

?si=dXwFi-OqakNfbc36

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे