Dombivli Fraudster : बाऊन्सर, गनमॅन अन् कोट्यवधींची फसवणूक! डोंबिवलीचा भामटा अखेर पोलिसांच्या ताब्यात

डोंबिवली : डोंबिवलीत स्वतःचा मोठा दबदबा असल्याचा आव आणत नामांकित बिल्डर, वकील आणि निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका भामट्याचा अखेर पर्दाफाश झाला आहे. बाऊन्सरची फौज आणि गनमॅन घेऊन फिरणारा निखिल भोईर याला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या फसवणुकीच्या रॅकेटमुळे अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. लोकांवर प्रभाव टाकून त्यांना मोठ्या कर्जाचे आमिष दाखवायचे आणि त्यानंतर लाखो-कोट्यवधी रुपयांची फसवणूक करायची, अशी त्याची कार्यपद्धती असल्याचे तपासात उघड झाले आहे.



या प्रकरणातील तक्रारदार असलेल्या एका नामांकित बिल्डरला १५ कोटी रुपयांच्या कर्जाची तातडीची गरज होती. त्यावेळी निखिल भोईर हा मोठमोठी कर्जे मंजूर करून देतो, अशी माहिती बिल्डरला त्याच्या मित्रामार्फत मिळाली. त्यानंतर बिल्डरने निखिलशी संपर्क साधला. निखिलनेही आपण सहज कर्ज मिळवून देऊ शकतो, असा विश्वास निर्माण केला. मात्र त्यासाठी सव्वा टक्के कमिशन आगाऊ द्यावे लागेल, अशी अट त्याने घातली.


मोठ्या आर्थिक गरजेपोटी बिल्डरने त्याच्यावर विश्वास ठेवत कमिशनची रक्कम आधीच दिली. त्यानंतर निखिलने बिल्डरला ५ कोटी रुपयांचा चेक दिला. मात्र हा चेक बँकेत जमा केल्यानंतर तो बाऊन्स झाला. ना कर्ज मिळाले, ना दिलेले पैसे परत आले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे बिल्डरच्या लक्षात आले आणि त्यांनी विष्णुनगर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.



तपासादरम्यान पोलिसांना समजले की, निखिल भोईर हा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने लोकांना जाळ्यात ओढत होता. स्वतःची प्रतिमा प्रभावशाली दाखवण्यासाठी तो कायम बाऊन्सरची मोठी टीम आणि एक गनमॅन सोबत घेऊन फिरत असे. त्याच्या या थाटामाटामुळे समोरच्या व्यक्तींना तो अत्यंत मोठा आणि प्रभावशाली व्यक्ती असल्याचा भास होत असे. त्यामुळे मोठमोठे व्यावसायिक, वकील आणि निवृत्त वरिष्ठ अधिकारीही त्याच्यावर सहज विश्वास ठेवत होते.


“कोणत्याही रकमेचे कर्ज मी मंजूर करून देऊ शकतो,” असा दावा करत तो लोकांना विश्वासात घेत असे. या विश्वासाच्या जोरावर त्याने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, त्याने नामांकित वकील आणि निवृत्त एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांनाही फसवले असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.



बिल्डरच्या तक्रारीनंतर विष्णुनगर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान निखिल भोईर हा सराईत भामटा असल्याचे उघड झाले. त्याच्याविरोधात यापूर्वीच सहा गुन्हे दाखल असून, त्यापैकी चार गुन्हे फसवणुकीचे आहेत. पोलिसांनी सापळा रचत डोंबिवली पश्चिमेतील गुप्ते रोड परिसरातून त्याला ताब्यात घेतले. अटकेनंतर त्याच्याकडे चौकशी सुरू असून, उद्या त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


निखिल भोईरने आतापर्यंत किती जणांना अशाच प्रकारे फसवले आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत. मोठ्या नावांचा वापर, बाऊन्सरचा गराडा आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाचा आव आणत त्याने कोट्यवधी रुपयांची माया जमवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या अटकेनंतर डोंबिवलीतील अनेक व्यावसायिक आणि नामांकित व्यक्तींनी सुटकेचा निःश्वास सोडला असला, तरी या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांपासून मोठ्या उद्योजकांपर्यंत प्रत्येकाने आर्थिक व्यवहार करताना अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Sugar hoarding : साखरेच्या साठेबाजीला आळा; केंद्र सरकारकडून स्टॉक लिमिट २ हजार क्विंटलवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सणांपूर्वी किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर