Vijay Shankar Retirement : तब्बल ६ वर्ष टीम इंडियातून बाहेर, आयपीएल लिलावातही दुर्लक्षित… अखेर विजय शंकरची निवृत्ती

Vijay Shankar : भारतीय संघाचा 3D प्लेयर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय शंकरने अखेर देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आयपीएल २०२६च्या लिलावात एकाही फ्रँचायझीने त्याच्यावर बोली लावली नव्हती. या पार्श्वभूमीवर विजय शंकरने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत निवृत्ती जाहीर केली आहे.


क्रिकेट हेच माझं आयुष्य… - विजय शंकर


विजय शंकरने (३५) पोस्टमध्ये लिहिलं, वयाच्या दहाव्या वर्षापासून क्रिकेट माझं आयुष्य बनलं होत. गेल्या २५ वर्षांत मला भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. देशाचं प्रतिनिधित्व करणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात अभिमानाचा क्षण होता. तो पुढे म्हणाला, आता नव्या संधींच्या शोधासाठी मी देशांतर्गत क्रिकेट आणि IPL मधून निवृत्ती घेत आहे. मात्र मी क्रिकेटपासून पूर्णपणे दूर जाणार नाही.





२०१९ नंतर टीम इंडियात संधीच नाही


विजय शंकरने भारतासाठी १२ वनडे आणि ९ टी-२० सामने खेळले. २०१९ एकदिवसीय वर्ल्ड कप संघात त्याची निवड चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर त्याला पुन्हा टीम इंडियात संधी मिळाली नाही. तब्बल ६ वर्षे संघाबाहेर राहूनही त्याने मेहनत सोडली नाही.


IPL मध्ये अनेक संघांचं प्रतिनिधित्व


विजय शंकर आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला. त्याने ७८ आयपीएल सामन्यांत १२३३ धावा आणि ९ विकेट्स घेतल्या. मात्र यंदाच्या आयपीएल २०२६ लिलावात ३० लाखांच्या बेस प्राईसवर नोंदणी करूनही त्याला कोणत्याही संघाने संधी दिली नाही.






टीका, ट्रोलिंगला दिले उत्तर


पोस्टच्या शेवटी विजय शंकर भावुक झाला. माझ्यावर खूप टीका झाली. पण मी हार मानली नाही. पॉझिटिव्ह राहून मेहनत करत राहिलो. मी करू शकतो, तर कुणीही करू शकतो, असा प्रेरणादायी संदेश त्याने चाहत्यांना दिला.


फर्स्ट क्लास क्रिकेटमधील कामगिरी


फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये विजय शंकरने आतापर्यंत ७७ सामन्यांत ४२५३ धावा केल्या असून त्यात १३ शतकं आणि २३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने ४३ विकेट्सही घेतल्या आहेत. List-A क्रिकेटमध्ये २७९० धावा तर टी-२० क्रिकेटमध्ये २५८३ धावा त्याच्या नावावर आहेत.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून