Recession : ऑगस्ट २०२६ मध्ये जागतिक महामंदी येणार ?

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण विरोधात युद्ध सुरू केले. या युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या मालवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला. होर्मुझ प्रश्नावर ऑगस्ट २०२६ पर्यंत ठोस तोडगा निघाला नाही तर जगात महामंदी येईल. ही महामंदी २००८ पेक्षा मोठी असेल, अशी भीती अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.


ब्रेंट क्रुडचे दर प्रति बॅरल १३० डॉलर पेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. तेल पुरवठा जुलै २०२६ पर्यंत सुरळीत झाला नाही तर जगापुढे तेल टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे यंदाच्या तिसऱ्या तिमाहीत तेल क्षेत्रात दररोज साठ लाख बॅरलची तूट निर्माण होण्याचा धोका आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरता वाढून महागाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.होर्मुझ सामुद्रधुनी आणि इराणच्या युरेनियम साठ्यावरून पश्चिम आशियात तणावाचे वातावरण आहे. या तणावाचा परिणाम तेल बाजारावर होत आहे. फेब्रुवारीअखेरपासून आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती जवळपास दुप्पट झाल्याचे समोर आले आहे. तेलाच्या किमती सतत वाढल्या तर मंदी येण्याचा धोका वाढेल. यामुळे होर्मुझप्रश्नी तोडगा निघणार की नाही, याकडे अनेकांचे लक्ष आहे.

Comments
Add Comment

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला