Yuzvendra Chahal : तिला माझ्या आयुष्यातून काढल्यांनतर माझे आयुष्य पूर्णपणे बदललं; हरलीनसमोर युझीने व्यक्त केली मनातली खदखद...

Yuzi Chahal : आयपीएल २०२६ च्या निर्णायक टप्प्यात पंजाब किंग्सचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल पुन्हा चर्चेत आला आहे. यावेळी निमित्त गोलंदाजी नाही, तर त्याने केलेला भावनिक खुलासा आहे. भारतीय महिला क्रिकेटपटू हरलीन देओलसोबत संवाद साधताना चहल आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने बोलला. दारू सोडल्यानंतर आयुष्य कसं बदललं, हे त्यानं सांगितलं. पंजाब किंग्सच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरील कँडिड विथ किंग्स या पॉडकास्टमध्ये हरलीनने चहलला थेट प्रश्न विचारला की, तू दारू पिणं सोडलंस ना? यावर चहलने दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.


तो माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम निर्णय


चहल म्हणाला, दारू आयुष्यातून काढून टाकल्यानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. हा माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम निर्णय होता. आता मी कुटुंब आणि मित्रांसोबत जास्त वेळ घालवतो. कोण खरंच माझ्यासोबत आहे आणि कोण नाही, हे मला आता स्पष्टपणे समजू लागलं आहे. तो पुढे म्हणाला, पूर्वी मी प्रत्येक गोष्टीचा खूप विचार करायचो. पण आता स्वतःवर जास्त लक्ष देतो. चहलने आपल्या मानसिक संघर्षाबद्दलही मोठा खुलासा केला. एक वेळ अशी आली होती की मी पूर्णपणे निराश झालो होतो. मानसिक स्थिती चांगली नव्हती. मला जाणवलं की दारू माझ्यासाठी योग्य नाही. त्यानंतर मी स्वत:च दारू सोडण्याचा निर्णय घेतला असं तो म्हणाला.


IPL मध्ये चहलची दमदार कामगिरी


IPL 2026 च्या मेगा लिलावात पंजाब किंग्सने चहलला तब्बल १८ कोटी रुपयांत संघात घेतलं होतं. यापूर्वी तो मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. आतापर्यंत १८९ आयपीएल सामन्यांत चहलने २३१ विकेट्स घेतल्या आहेत. तो आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक मानला जातो.

Comments
Add Comment

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सामना पराभवाचा वेग काही भलताच, आतापर्यंत सर्व भारतीय कर्णधारांना टाकलं मागे

[caption id="attachment_1066530" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका विजयाचं गणित

IND vs WI: वेस्ट इंडिजने चौथ्या सामन्यात डाव साधला, भारताला नमवून मालिकेत 2-2 ने बरोबरी

वेस्ट इंडिजने चौथ्या टी20 सामन्यात भारताला नमवून मालिका विजयाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. या मालिकेत चौथ्या