Nashik : नाशिक विधानपरिषदेत भाजप-शिवसेना आमनेसामने ? अंतर्गत संघर्ष वाढण्याची चिन्हे

 Nashik : नाशिक विधानपरिषदेच्या ( Legislative Council ) जागेवरून भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यातील वाद आता उघडपणे समोर येऊ लागला आहे. दोन्ही पक्षांनी या जागेवर आपला दावा ठोकल्याने महायुतीत अंतर्गत संघर्ष वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, शिवसेनेने माघार घेण्यास नकार दिल्यास भाजप आणि शिवसेना यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.


२०१८ च्या विधानपरिषद निवडणुकीत ही जागा शिवसेनेकडे होती. शिवसेनेचे नरेंद्र दराडे (Narendra Darade) विजयी झाले होते. त्यामुळे परंपरेनुसार ही जागा पुन्हा शिवसेनेकडेच राहावी, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे. खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनीही “ज्या पक्षाकडे जागा आहे, ती त्याच पक्षाने लढवावी” असे स्पष्ट मत व्यक्त करत शिवसेनेचा दावा मजबूत केला आहे.


दुसरीकडे, भाजपनेही या जागेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवून नाशिकमध्ये भाजपची मजबूत संघटनात्मक ताकद आणि सर्वाधिक मतदारसंख्या लक्षात घेता ही जागा भाजपलाच मिळावी, अशी मागणी केली आहे. मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे देखील ही जागा भाजपकडेच राहावी, या मताचे असल्याचे बोलले जात आहे.



सर्वाधिक मतदारसंख्या भाजपकडे


विधानपरिषद निवडणुकीत ६१९ सदस्य मतदान करणार असून त्यापैकी महायुतीकडे तब्बल ४६६ मतांचे बळ आहे. यात भाजपकडे १८८, शिवसेनेकडे १७१ तर राष्ट्रवादीकडे १०७ सदस्य आहेत. त्यामुळे सर्वाधिक मतदारसंख्या भाजपकडे असल्याने पक्षाने या जागेवर दावा अधिक आक्रमकपणे मांडला आहे.


दरम्यान, शिवसेनेकडून माजी आमदार नरेंद्र दराडे किंवा आमदार सुहास कांदे (Suhas Kande)  यांच्या पत्नी अंजुम कांदे (Anjum Kande) यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. हे दोघेही मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  यांचे राजकीय विरोधक मानले जातात. त्यामुळे शिवसेनेने यापैकी कोणालाही उमेदवारी दिल्यास भुजबळ भाजपच्या बाजूने सक्रिय भूमिका घेऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे.



राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक ठरणार


याच पार्श्वभूमीवर, भाजप-शिवसेना संघर्ष वाढल्यास राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेला राजकीय धक्का देण्यासाठी भाजप राष्ट्रवादीसोबत रणनीती आखू शकते. इतकेच नव्हे तर भाजपकडून छगन भुजबळ यांच्या पसंतीच्या उमेदवारालाही संधी मिळू शकते, अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. त्यामुळे नाशिकच्या लढतीकडे सर्वाचेच लक्ष लागून राहीले आहेत.

Comments
Add Comment

Apple iPhone18 : iPhone 18 Pro, Pro Maxच्या प्री-ऑर्डरला विलंब? १२ सप्टेंबरपासून बुकिंग सुरू होण्याची शक्यता

मुंबई : ॲपलच्या आगामी iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Maxची उत्सुकता वाढली असून, या दोन्ही प्रीमियम मॉडेल्सच्या प्री-ऑर्डरची तारीख

Nashik Crime : समृद्धी महामार्गावरील दरोड्याप्रकरणी सात जण ताब्यात, ५ फरार आरोपींचा शोध सुरू

Nashik Crime : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Nashik News : समृध्दी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना, लुटीच्या घटनांनंतर पोलीस सतर्क

Nashik News : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

NCP Core Committee Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची देवगिरी येथे महत्त्वपूर्ण बैठक; संघटनात्मक बांधणीवर चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पार