Latur : शिवराज मोटेगावकरांना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस; अनधिकृत बांधकाम प्रकरण तापले

लातूर : लातूर ग्रामीणमधील खोपेगाव ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक ११४ मधील बांधकाम प्रकरणी विकासक Shivraj Motegaonkar यांना जिल्हाधिकारी डॉ. भारत बस्तेवाड यांनी २१ मे रोजी नोटीस बजावली आहे. बांधकाम परवानगीसाठी मंजूर करण्यात आलेल्या नकाशातील बांधकाम क्षेत्र आणि अंतिम अभिन्यास मंजुरीसाठी सादर करण्यात आलेल्या सीमांकन नकाशातील बांधकाम क्षेत्रामध्ये मोठी तफावत आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.




नोटिशीनुसार, अनधिकृत बांधकामाबाबत विकासकाने शासनाकडे तडजोड शुल्क जमा केल्यास पुढील कार्यवाही नियमानुसार करण्यात येईल. तसेच नगररचना विभागाने यापूर्वीच बीपीएमएस प्रणालीद्वारे सुधारित बांधकाम नकाशे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अद्याप सुधारित नकाशे सादर करण्यात आलेले नाहीत.




जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, नगररचना विभागाकडून अंतिम अहवाल आणि तडजोड शुल्काची रक्कम निश्चित होईपर्यंत पुढील प्रक्रिया होणार नाही. तसेच सुधारित नकाशे सादर केल्याशिवाय शुल्काची रक्कमही निश्चित केली जाणार नाही. त्यामुळे एका महिन्याच्या आत सुधारित बांधकाम नकाशे नगररचना विभागाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून आदेशाचे पालन न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नोटिशीत देण्यात आला आहे.




नीट पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित चौकशीची चर्चा

दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीदरम्यान शुक्रवारी काही व्यक्तींची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधितांचा या प्रकरणाशी थेट संबंध असल्याचे ठोस पुरावे मिळाल्याशिवाय सीबीआय त्यांना ताब्यात घेणार नाही.

एका व्यक्तीकडे त्यांच्या मुलांच्या नीट परीक्षेच्या तयारीसंदर्भातील कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती. मात्र संबंधितांनी शैक्षणिक साहित्य आणि कागदपत्रे रद्दीत गेल्याचे सांगितले. त्यानंतर संबंधित रद्दी विक्रेत्यालाही चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्याने १२ रुपयांची रद्दी पुढे विकल्याचे सांगितल्याने संबंधित कागदपत्रांचा मागोवा लागू शकला नसल्याची चर्चा सध्या लातूरमध्ये रंगत आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी