बीड भूसंपादन घोटाळ्यातील जिल्हाधिकाऱ्याचे अखेर निलंबन

मुख्यमंत्र्यांचे निर्देश; वाढीव मोबदल्याआडून शासनाची ७३ कोटींची फसवणूक


मुंबई : बीड जिल्ह्यातील बहुचर्चित राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर राज्य शासनाने ही कारवाई केली असून, अटकेच्या तारखेपासून हे निलंबन लागू करण्यात आले आहे. या महाघोटाळ्यात मागच्या तारखांचे बनावट आदेश तयार करून शासनाची तब्बल ७३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका पाठक यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी ७ मे रोजी लातूर येथून अविनाश पाठक यांना अटक करण्यात आली होती. फौजदारी गुन्ह्यात ४८ तासांपेक्षा जास्त काळ कोठडीत असलेल्या शासकीय अधिकाऱ्याला निलंबित करण्याच्या नियमानुसार, राज्य सरकारने आता हे निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. निलंबन काळात पाठक यांचे मुख्यालय बीड हेच निश्चित करण्यात आले आहे.


नेमके प्रकरण काय?

राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला बेकायदेशीरपणे वाढवून देण्यासाठी हा संपूर्ण कट रचला गेला होता. अविनाश पाठक यांची २२ एप्रिल २०२५ रोजी बीडच्या जिल्हाधिकारी पदावरून बदली झाली होती. मात्र, त्यानंतरही त्यांच्या कार्यकाळातील मागच्या तारखा (१ मार्च ते १७ एप्रिल २०२५) वापरून वाढीव मोबदल्याचे नस्ती (फाईल) आदेश तयार करण्यात आले.या मागच्या तारखेतील आदेशांद्वारे १५४ प्रकरणांमधील जमिनीचा मोबदला तब्बल २४१ कोटी ६२ लाख रुपयांनी वाढवून दाखवण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, महसूल प्रशासनातील कोणतीही अधिकृत नोंदवही (रजिस्टर) न ठेवता, यातील ७३ कोटी ४ लाख रुपयांचे खातेदारांना वाटपही करण्यात आले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महसूल कर्मचारी आणि वकिलांसह एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने