LSG vs PBKS : मिशेल मार्श संघाबाहेर, पण पंजाबसाठी खरा धोका या माजी खेळाडूकडून

IPL 2026: आयपीएल २०२६ मधील लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना प्लेऑफच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या सामन्यापूर्वी लखनऊला मोठा धक्का बसला आहे. या हंगामात संघाचा सर्वात यशस्वी फलंदाज मिशेल मार्श या सामन्यात उपलब्ध नसणार आहे. मात्र, मार्श नसला तरी पंजाबसाठी धोका अजूनही कायम आहे. मिशेल मार्श या हंगामात लखनऊसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने 13 डावांत 563 धावा करत दोन शतकं आणि तीन अर्धशतकं झळकावली आहेत. मात्र ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान दौऱ्यासाठी राष्ट्रीय संघात सामील झाल्याने या सामन्यात गैरहजर असणार आहे.


यंदाचा हंगाम लखनउसाठी अत्यंत निराशाजनक राहिला आहे, ते 13 पैकी केवळ 4 सामने जिंकत गुणतालिकेत तळाशी आहेत. तरीही अखेरचा सामना जिंकून हंगामाचा शेवट गोड करण्याचा लखनऊचा प्रयत्न असेल.दुसरीकडे पंजाब किंग्ससाठी हा डू ओर डाय सामना आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाबला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक आहे. मात्र फक्त विजय पुरेसा ठरणार नाही. राजस्थान रॉयल्सचा पराभव आणि दिल्ली कॅपिटल्सने केकेआरला हरवणंही पंजाबसाठी तितकंच महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतरच पंजाबला प्लेऑफ गाठता येईल.


मार्शच्या अनुपस्थितीतही पंजाबसाठी सर्वात मोठा धोका जोश इंग्लीश ठरू शकतो. जोश इंग्लिश मागील हंगामात पंजाबसाठी खेळत होता. पंजाबचा इतिहास आहे की अनेकदा संघातून बाहेर झालेले माजी खेळाडू चमकदार कामगिरी करतात आणि याच कारणामुळे पंजाबची चिंता वाढली आहे.दरम्यान, राजस्थानने मुंबईविरुद्ध विजय मिळवला तर ते थेट प्लेऑफमध्ये पोहोचतील. मात्र राजस्थान पराभूत झाला आणि केकेआरने दिल्लीला हरवलं, तर चौथ्या स्थानासाठी नेट रनरेटचा थरार रंगू शकतो. त्यामुळे आता प्रत्येक सामन्यासोबत आयपीएल २०२६ चं गणित अधिकच रोमांचक बनत चाललं आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून