Nashik : पोलिसांकडून ४ कोटी ८० लाख किमतीचे अमली पदार्थ नष्ट

नाशिक  : नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातर्फे एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत जप्त करण्यात आलेल्या एकूण ₹४ कोटी ८० लाख किमतीच्या अमली पदार्थांचा विधीवत नाश करण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. भद्रकाली पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हा क्र. 3036/2010 अंतर्गत एनडीपीएस कायदा कलम ८ (क), २० (ब), २९ अन्वये जप्त करण्यात आलेला गांजा मा. न्यायालयाच्या आदेशानुसार नष्ट करण्यात आला.


या कारवाईत एकूण २,४०० किलो गांजा होता. दिनांक २२ मे २०२६ रोजी ही नष्ट प्रक्रिया महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड, रांजणगाव, पुणे येथे काटेकोर सुरक्षा व पर्यावरणीय नियमांचे पालन करून पार पाडण्यात आली. जप्त अमली पदार्थांचा नाश उच्चस्तरीय ड्रग डिस्पोजल समितीच्या देखरेखीखाली करण्यात आला.


यावेळी अपर पोलीस महासंचालक ज्योतिप्रिया सिंग, पोलीस उपमहानिरीक्षक प्रविणकुमार पाटील, पोलीस अधीक्षक अनुज तारे, तसेच पोलीस उपआयुक्त (गुन्हे, नाशिक शहर) किरणकुमार चव्हाण यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, उपनिरीक्षक रंजन बेंडाळे आणि अंमली पदार्थविरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार, तसेच भद्रकाली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कारवाईमुळे नाशिक शहर पोलीस दलाची अंमली पदार्थांविरुद्धची कठोर व सातत्यपूर्ण भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे.




६४ वर्षीय वृद्धेला लुटले


तर दुसरीकडे नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयातून पायदुखीचे औषध घेऊन बाहेर पडणाऱ्या ६४ वर्षीय वृद्धेला दोन अनोळखी महिलांनी पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध देत बेशुद्ध केले आणि त्यांच्या अंगावरील तब्बल दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


जिल्हा रग्णालयाच्या आवारात दोन अनोळखी महिलांनी लताबाई आबाजी लभडे (वय ६४) यांना पाणी पिण्यास दिले. पाणी पिताच लताबाईंना चक्कर आली आणि त्या तिथेच बेशुद्ध पडल्या. काही वेळाने लताबाईंची गुंगी उतरली. त्यांना दोन्ही महिला गायब असल्याचे दिसले. त्यांनी स्वतःची तपासणी केली असता, गळ्यातील १० ग्रॅमची सोन्याची पोत आणि कानातील ५ ग्रॅमची सोन्याची कर्णफुले असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याचे समजताच लताबाईंनी तातडीने सरकारवाडा पोलिस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


संशयित महिला परजिल्ह्यातील एखाद्या संघटित लुटारू टोळीच्या सदस्य असण्याची दाट शक्यता आहे. अशा प्रकारची टोळी शहरात सक्रिय झाल्याा अंदाज वर्तविला जात आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण